Viral Latest News : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये संतापजन घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाच मुलांची आई सपना (35) आणि तिचा प्रेमी मनिषने (25) स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना घडली. दोघांनाही लग्न करायचं होतं. पण त्यांचं लग्न यशस्वी होत नव्हतं. अशातच या दोघांनी स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांना मृतदेहाजवळ एक नोट सापडली आहे. यात त्यांनी टोकाचं पाऊल उचण्यामागचं कारण सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
पतीपासून वेगळं राहत होती सपना
हे धक्कादायक प्रकरण बुलंदशहर जनपदच्या ककोड परिसरातील बीघेपूर गावात घडली. सपनाचं तिच्या पतीसोबत खूप वादविवाद होत होते. ती मागील अडीच वर्षांपासून पतीपासून वेगळं राहत होती. त्याचदरम्यान सपनाचं मनीषसोबत प्रेमसंबंध सुरु झालं. दोघांच्या प्रेमाबद्दल संपूर्ण गावाला माहिती होतं.
हे ही वाचा >>काय सांगता! 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 नव्हे, 500 रुपये मिळणार, यादीत तुमचं नाव आहे का?
दोघेही नेहमी एकत्र फिरायचे. पण दोघांनाही लग्न करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. दोघांनीही झाडाला लटकून फाशी घेत जीवन संपवलं. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवल्याचं पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशत्या अमरोहा येथेही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली होती. एका महिलेनं दुसऱ्यांदा लग्न तर केलंच होतं, पण ती महिला पुन्हा एकदा बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यानंतर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने पोटच्या मुलवांना सोडलं. लग्नासाठी या महिलेनं तिचा धर्म आणि नावही बदललं होतं. या संपूर्ण घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती.
हे ही वाचा >> कामाची बातमी: तात्काळ तिकीट बुक करण्याचे रामबाण उपाय, चुटकीसरशी बुक होईल तुमचं तिकीट
ADVERTISEMENT
