34 वर्षांची सासू अन् 24 वर्षांचा जावई, अनिता आणि राहुलच्या प्रकरणाचीच तुफान चर्चा

Aligarh News: अलीगढमधील पळून गेलेल्या सासू आणि जावयाची चर्चा सुरु असतानाच त्याबाबतीत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यादरम्यान, पळून गेलेली महिला आणि आरोपी तरुणाचं वय किती? याबद्दलची माहिती समोर आली आहे.

सीसू आणि जावयाबद्दल नवी माहिती समोर

सीसू आणि जावयाबद्दल नवी माहिती समोर

मुंबई तक

15 Apr 2025 (अपडेटेड: 15 Apr 2025, 09:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अलीगढमधील सासू आणि जावयाचे प्रेमप्रकरण

point

पळून गेलेल्या सासू आणि जावयाच्या केसमधील नवीन अपडेट

point

पळून गेलेल्या सासू आणि जावयाचं वय किती?

Aligarh News: अलीगढमधील पळून गेलेल्या सासू आणि जावयाची चर्चा सुरु असतानाच त्याबाबतीत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. होणाऱ्या जावयाच्या म्हणजेच राहुलच्या वडिलांनी त्याला संपत्तीमधून बेदखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या वडिलांच्या मते, या घटनेमुळे आणि मुलाच्या वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. अशात, मुलाशी नातं ठेवण्यात काहीच अर्थ नाही. राहुल त्याच्या घरातून काही पैसे आणि दागिने घेऊन गेल्याचं राहुलच्या वडिलांनी सांगितलं. यादरम्यान, पळून गेलेल्या सासू आणि जावयाचं वय किती? याबद्दलची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहिलेचे वय 34 वर्ष असून आरोपी तरुणीचे वय 24 वर्ष आहे. 

हे वाचलं का?

बऱ्याच नातेवाईकांकडून चौकशी

अलीगढचे DSP महेश कुमार यांनी सांगितले की राहुलच्या नातेवाईकांची आणि मित्रांची चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप यातून काही ठोस माहिती मिळाली नाही. अलीगढमधील मडराक पोलिसांनी उत्तराखंडातील रूद्रपूरचे रहिवासी राहुलचा मेहुणा, त्याचे वडील आणि  इतर कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी बोलावले. दरम्यान, पोलिसांना त्याच्या मेहुण्यावर सर्वात मोठा संशय आहे की त्याने राहुलला पळून जाण्यास मदत केली असावी कारण ते दोघेही नुकतेच उत्तराखंडमध्ये भेटले होते. DSP महेश कुमार यांच्या मते, अजून चौकशी आणि दोघांचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा: 'सासूने जावयावर जादू केली अन्, त्याला आपल्या...' आता समोर आली भलतीच माहिती

शेरवानी घेण्याचं कारण सांगून घरातून निघाला

लग्नाची शेरवानी घेण्यासाठी राहुल त्याच्या मेहुण्याकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, राहुल त्याच्या मेहुण्याकडे गेलाच नसल्याचे त्याच्या मेहुण्याने सांगितलं आहे. तसेच, "त्याने घरातून निघण्यापूर्वी काय सांगितले, याबद्दल मला काहीच माहित नाही", असे राहुलच्या मेहुण्याचे स्पष्ट मत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुलच्या मेहुण्याने या प्रकारणात पोलिसांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यास नकार दिला आहे. 

राहुलच्या घरच्यांनी सुद्धा केले आरोप

आरोपी तरुण राहुलच्या वडिलांनी त्याच्या होणाऱ्या सासूवर जादूटोणा आणि वशिकरणाचा आरोप केला आहे. माध्यमांशी बोलताना त्याच्या वडिलांनी सांगितले की "त्याची होणारी सासू इथे आली आणि पाच दिवस राहिली." तेव्हा 'त्याच्या होणाऱ्या सासूने राहुलसाठी दोन ताबीज आणले. त्याने एक ताबीज राहुलच्या गळ्यात आणि दुसरे त्याच्या कमरेला बांधले होते. आता तो अशाप्रकारे गायब झाल्यानंतर हे सर्व त्याच ताबीजमुळे झालेल्या जादूचे परिणाम आहेत', असा आरोप राहुलच्या वडिलांनी केला आहे. 

हे ही वाचा: "त्यांना मारणार..", लॉरेन्स बिष्णोईची सोशल मीडिया पोस्ट पुन्हा व्हायरल! कोण आहेत टार्गेटवर?

मोबाईल नंबर बंद असल्यामुळे ट्रेस होण्यात अडचण

लग्नापूर्वी घरातून पळून गेलेल्या सासू आणि जावईचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. पोलीस वेगवेगळ्या स्तरावरुन दोघांनाही शोधण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. तसेच, ज्या दिवसापासून ते दोघे पळून गेले त्या दिवसापासून दोघांचेही मोबाईल फोन बंद आहेत. त्यामुळे दोघे कुठे असतील? याचा नेमका सुगावा लागू शकत नाहीये. 

'परत आल्यानंतर मारुन टाकू'- महिलांची प्रतिक्रिया

मडराक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मनोहरपूर गावातील रहिवासी अनिता देवी यांच्याबद्दल गावातील इतर महिलांमध्ये खुपच संताप आहे. ज्या पद्धतीने या बातमीची देशभर चर्चा होत आहे, त्यावरून गावातील महिला म्हणतात की "अनिताने गावाचे नाव धुळीस मिळवले." यामुळेच गावात राहणाऱ्या सर्व लोकांमध्ये अनिताविषयी प्रचंड राग असल्याचे दिसून येत आहे. "जर ती गावात आली तर तिला जीवानिशी मारुन टाकू", असं गावातील महिलांचं म्हणणं आहे. 

    follow whatsapp