Marriage Ceremony Viral News : उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये लग्नमंडपात मोठा राडा झाल्याने एकच खळबळ उडाली. मेहुणीने भाऊजींचे बूट चोरी करून 15 हजार रुपयांची मागणी केली. परंतु, नवऱ्याने मेहुणीला पैसै देण्यास नकार दिला. त्यानंतर नवऱ्याचे वऱ्हाडी आणि नवरीच्या कुटुंबातील लोकांमध्ये हाणामारी झाली. वाद इतका वाढला की, नवरा नवरीला मंडपातच सोडून आपल्या पाहुण्यांसोबत घरी परतला.
ADVERTISEMENT
रिझवानने मेहुणीला दिले होते 2100 रुपये
बिजनौरच्या कस्बामध्ये ही खळबळजनक घटना घडली. येथील बँकेट हॉलमध्ये नजीबाबाद मोहल्ला हर्षवाडा येथे राहणारा रिझवान वरात घेऊन आला होता. वरात पोहोचल्यावर नवरीच्या कुटुंबियांनी पाहुण्यांचं भव्य स्वागत केलं. लग्नाचे फेरेही घेण्यात आले. त्यानंतर मेहुणीने तिचे भाऊजी रिझवानचे बूट चोरून पैशांची मागणी केली.
हे ही वाचा >> काय सांगता! 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 नव्हे, 500 रुपये मिळणार, यादीत तुमचं नाव आहे का?
रिझवानने बूट परत मागितल्यानंतर मेहुणीने सांगितलं की, 15 हजार रुपये दिल्यावरच बूट परत मिळतील. त्यानंतर रिझवानने 15 हजार रुपयांऐवजी 2100 रुपये त्याच्या मेहुणीला दिले. परंतु, 2100 रुपये घेण्यास मेहुणीने नकार दिला. याचदरम्यान, नवरीच्या मोठ्या बहिणीचंही लग्न सुरु होतं. त्या लग्नात मोठ्या भाऊजींकडून मेहुणीला 15000 रुपये मिळाले होते. अशातच मेहुणीने तिचे छोटे भाऊजी रिजवानकडेही 15 हजार रुपयांची मागणी केली.
हे ही वाचा >> कामाची बातमी: तात्काळ तिकीट बुक करण्याचे रामबाण उपाय, चुटकीसरशी बुक होईल तुमचं तिकीट
पण त्याने फक्त 2100 रुपयेच दिल्याने लग्नात राडा झाला. नवरा-नवरीच्या कुटुंबियांमध्ये जोरदार भांडण झाल्याने नवरा प्रचंड संतापला. त्यानंतर दोन्ही कुटुंबाता हाणामारी झाली आणि लग्नही मोडलं. हे धक्कादायक प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना समज देण्याचा प्रयत्न केला. पण नवरा नवरीला वरातीत सामील न करताच घरी निघून गेला.
ADVERTISEMENT
