Ladki Bahin Yojana Updates: लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये? CM होताच फडणवीसांनी थेट सांगितलं

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana Installment:  राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana

मुंबई तक

06 Dec 2024 (अपडेटेड: 06 Dec 2024, 07:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

CM पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

point

लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये?

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana :  राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता या योजनेबाबतचा निर्णय आगामी अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना सुरु राहील. महिलांना मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या रक्कमेत वाढ करून 2100 रुपये दिले जातील. दरम्यान, या वाढीव रक्कमेचा लाभ पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानंतरच मिळणार असल्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या योजनेचा लाभ फक्त  त्याच महिलांना मिळेल ज्या महिला पात्रता निकषात योग्य ठरतात. महिलांच्या तक्रारींची तपासणी केली जाईल आणि अयोग्य लाभार्थ्यांना योजनेतून काढून टाकलं जाईल. फडणवीसांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उदाहरण देत म्हटलं, "सुरुवातीला या योजनेचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांनाही मिळाला होता.

हे ही वाचा >> 6 December 2024 Gold Rate: थांबा जरा! सोनं खरेदी करताय? मुंबईतील आजचा भाव वाचून धडकीच भरेल

पण नंतर त्यांचा समावेश न करता पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला गेला. लाडकी बहीण योजनेतही अशा प्रकारची प्रक्रिया सुरु केली जाईल. जेणेकरून ही योजना योग्य पद्धतीने सुरु केली जाईल. फडणवीस महिलांना आश्वस्त करत म्हणाले, "सरकारने जे वचन दिलं आहे, ते पूर्ण केलं जाईल. आम्ही निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधने आणि व्यवस्थेवर काम केलं जाईल". 

हे ही वाचा >> 6 December 2024 Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा! 'या' राशीचो लोक होतील कंगाल, तुमचं भविष्य काय?

आगामी अर्थसंकल्पात मोठा निर्णय

राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2.43 कोटी महिलांना लाभ मिळल्याचं सांगण्यात आलंय. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला 3700 कोटी रूपये मोजावे लागत आहेत.  लाभार्थ्यांच्या तक्रारीची चौकशी आणि आगामी बजेटनंतरच योजनेच्या वाढीव रक्कमेचा लाभ मिळेल.

    follow whatsapp