Diwali Padwa 2024 : यंदा दिवाळी पाडवा कधी आहे? बलिप्रतिपदाचे महत्व आणि कथा वाचा

मुंबई तक

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 05:49 PM)

Diwali Padwa 2024 : 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. पती पत्नीच्या अतूट प्रेमाच्या या सणाला फार महत्व आहे. या दिवशी पत्नीकडून पतीची आरती करण्यासह त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते.

diwali 2024 diwali paddwa 2024 balipratipada date importance and signficance reaf full article

बलिप्रतिपदाचे महत्व वाचा

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिवाळी पाडवा किती तारखेला आहे?

point

बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा

point

पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते?

Diwali Padwa 2024 : यंदा 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी लक्ष्मीपूजनही केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. पती पत्नीच्या अतूट प्रेमाच्या या सणाला फार महत्व आहे. या दिवशी पत्नीकडून पतीची आरती करण्यासह त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. (diwali 2024 diwali paddwa 2024 balipratipada date importance and signficance reaf full article) 

हे वाचलं का?

वहीपूजन मुहूर्त 

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. वहीपूजन मुहूर्त (2 नोव्हेंबर 2024  शनिवार) पहाटे 4.10 ते 6.40, सकाळी 8 ते 10.50

हे ही वाचा : Diwali 2024 Date: 'इतक्या' तासांसाठी आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर माहिती

पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते? 

या दिवशी अभ्यंगस्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवळतात. या दिवशी सोने खरेदी, सुवासणीकडुन पतीस औक्षण केले जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेट वस्तू देतो. नवविवाहित दांपत्यासाठी पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. याला दिवाळसन म्हणतात. यानिमित्ताने जावयास सासरच्यांकडून निमंत्रण दिले जाते. नंतर स्वादिष्ट जेवण बनवून जावयास खाऊ घातले जाते. आणि नंतर त्यास आहेर दिला जातो. तत्पुर्वी पत्नी आपल्या पतीला तेल आणि उटणे लावून मालिश करते आणि स्नान घालते आणि स्नान झाल्यावर पत्नीचे औक्षण करते.

बलिप्रतिपदेची आख्यायिका 

बलिप्रतिपदेची एक आख्यायिका आहे, त्यानुसार एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे तीन पायरी जमीनची मागणी केली होती. यावर त्याने ब्रह्मांड आणि पृथ्वीचे दोन पायऱ्यांमध्ये मोजमाप केलं होतं. यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरं पाऊल कुठे ठेवायचं असं विचारलं तेव्हा बळीने त्याचं डोकं पुढं केलं. 

हे ही वाचा : Narak Chaturdashi 2024: छोटी दिवाळी कधी आहे? नरक चतुर्दशीच्या रात्री यमाचा दिवा का लावला जातो?

असं मानलं जातं की, बळीनं आपलं डोकं वामनाचं चरणी धरलं आणि वामनानं त्याच्या मस्तकावर पाय ठेवताच तो अधोलोकात पोहोचला होता. त्या वेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की, प्रतिपदेला तुझी पूजा केली जाईल हा एक मोठा सण असेल. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली असं म्हणतात.

महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला आहे. यादिवशी गोठा स्वच्छ केला जातो. मग शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळलं जातं. तर मेंढ्यांच्या कौतुकाचा सण धनगर समाजात केला जातो. आदिवासी समाज आज गुरांच्या बकऱ्यांची पूजा करतात. 
 

    follow whatsapp