केस स्ट्रेटनिंग केल्यामुळे खरंच कर्करोग होतो? संशोधनात काय?

रोहिणी ठोंबरे

• 08:57 AM • 03 Jan 2024

केसांवर केमिकल्सचा वारंवार वापर केल्याने आरोग्यास हानी पोहोचते. केस स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समध्ये केमिकल्सचा वापर केला जातो आणि हे प्रोडक्ट्स आपण वारंवार वापरल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे

Does hair straightening really cause of cancer What is in research

Does hair straightening really cause of cancer What is in research

follow google news

Hair Straightening Causes to Cancer : प्रत्येक महिलेसाठी तिचं सौंदर्य खूप महत्त्वाचं असतं. यासाठी त्या मेकअपपासून ते हेअरस्टाइलपर्यंत अनेक गोष्टी करत असतात. तर कधी झटपट हेअरस्टाइलसाठी महिला केसांची स्ट्रेनिंग (Hair Straightening) करतात. यामुळे आपला लुक तर खुलून दिसतो मात्र याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (Does hair straightening really cause of cancer What is in research)

हे वाचलं का?

केसांवर केमिकल्सचा (Hair Straightening Products) वारंवार वापर केल्याने आरोग्यास हानी पोहोचते. केस स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समध्ये केमिकल्सचा वापर केला जातो आणि हे प्रोडक्ट्स आपण वारंवार वापरल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

वाचा: शिंदेंनी ‘तो’ मुद्दा छेडला, जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, “असे कृत्य घडू नये”

FDA ने दिलेल्या प्रस्तावात काय?

अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (अन्न व औषध प्रशासन) केस शायनिंग आणि स्ट्रेटनिंग उत्पादनांमध्ये फॉर्मेल्डिहाइड सोडणाऱ्या केमिकल्सवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे. एफडीएच्या या प्रस्तावाला भारतातील डॉक्टरांनीही पाठिंबा दिला आहे. भारतीय डॉक्टरही याकडे गंभीर समस्या म्हणून पाहत आहेत.

केस स्ट्रेटनिंग प्रक्रियेचा कर्करोगाशी थेट संबंध

एका अहवालानुसार, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि नॅशनल टॉक्सिकोलॉजी प्रोग्रामने फॉर्मेल्डिहाइडला ‘ह्यूमन (मानवी) कार्सिनोजेन’ म्हणून क्लासिफाइड केलं आहे. हे Nasopharyngeal आणि Sinonasal कर्करोग तसेच ल्युकेमियाच्या वाढत्या धोक्याशी संबंधित आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हे उत्पादन भारतात केस स्ट्रेट करणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या प्रक्रियेतून निघणारा धूर श्वसनाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो आणि वारंवार तसं झाल्यास कर्करोगाचा धोका वाढतो.

वाचा: Lok Sabha : महायुतीचे जागा वाटप कधी? शिंदेंच्या मंत्र्याने दिली महत्वाची माहिती

सतत वापर केल्याने कर्करोगाचा अधिक धोका!

दिल्ली राम मनोहर लोहिया रूग्णालयातील, त्वचा विशेषज्ञ डॉ. कबीर सरदाना यांनी सांगितले की, केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या या प्रोडक्ट्समुळे गर्भाशयाचा आणि स्तनाचा कर्करोग होऊ शकतो याचे काही पुरावे आहेत. 15 वर्षांहून अधिक काळ आणि वर्षातून किमान 5 वेळा त्याचा वापर केल्यास कर्करोगाचा धोका अधिक वाढतो. अशा प्रोडक्ट्सचा वापर टाळून कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो, असे डॉ सरदाना सांगतात.

केस स्ट्रेट करण्याचे इतर धोके कोणते?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉर्मेल्डिहाइडचे आणखी होणारे परिणाम म्हणजे, डोळ्यांची जळजळ, नाक आणि घशाची जळजळ आणि श्वासोच्छवासाच्या समस्या यांचा समावेश होतो. डॉक्टरांनी सांगितले की, दीर्घकाळ हे प्रोडक्ट्स वापरत राहिल्याने स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. हे टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

वाचा: संजय राऊतांचा फडणवीस, शेलारांना ‘जालीम डोस’! दाखवला वाजपेयी-आडवाणींचा व्हिडीओ

संशोधनात काय आढळले?

NIEHS पर्यावरण आणि कर्करोग एपिडेमियोलॉजी ग्रुपच्या प्रमुख अलेक्झांड्रा व्हाईट यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात असं आढळलं आहे की, केस स्ट्रेट करणाऱ्या प्रोडक्ट्सचा वारंवार वापर गर्भाशयाच्या कर्करोगाच्या वाढीव धोक्याशी संबंधित असू शकतो. वयाच्या 70 वर्षापर्यंत केस स्ट्रेटनिंग प्रोडक्ट न वापरणाऱ्या केवळ 1.6 टक्के महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होतो. तर प्रोडक्ट्सचा वारंवार वापर करणाऱ्या महिलांमध्ये हा धोका 4.1 टक्क्यांपर्यंत वाढतो.

    follow whatsapp