ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?

मुंबई तक

27 Nov 2024 (अपडेटेड: 27 Nov 2024, 11:17 AM)

Ladki Bahin Yojana Latest News Update:  राज्यात भाजपप्रणीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे लवकरच महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली जाणार आहे.

महिलांची दसरा, दिवाळी गोड होणार

महिलांची दसरा, दिवाळी गोड होणार

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत लेटेस्ट अपडेट काय?

Ladki Bahin Yojana Latest News Update:  राज्यात भाजपप्रणीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे लवकरच महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली जाणार आहे. परंतु, या निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अनेकांना उत्सुकता आहे. कारण लाभार्थी महिलांना या योजनेचे चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले होते. पण आता महिलांना सहाव्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा लागलीय. अशातच या योजनेच्या सहाव्या हफ्त्याचे 1500 रुपये डिसेंबर महिन्यात मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे वाचलं का?

महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्येही तुफान चर्चा रंगली. महायुतीला बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचवण्यात लाडकी बहीण योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निवडणूक संपल्याननंतर लाडकी बहीण योजनेच्या दरमहा देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांत वाढ केली जाईल, असं सरकारने घोषित केलं होतं. त्यामुळे डिसेंबरमध्ये योजनेच्या सहाव्या हफ्त्याचे पैसे दिले जाणार असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा >> 27 November Gold Rate: काय सांगता! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; मुंबईसह 'या' शहरांतील आजचे दर काय?

महायुती सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री राहिलेल्या आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं की, डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हफ्ता मिळू शकतो. त्यांनी 19 ऑक्टोबर 2024 ला एक्सवर म्हटलं होतं की, लाडकी बहीण योजना पुढेही सुरु राहील. ही योजना जुलै 2024 पासून सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत आणि नोव्हेंबरपर्यंतचे पैसे देण्यात आले आहेत. ही योजना पुढेही सुरु राहील आणि याचा पुढचा हफ्ता डिसेंबरमध्ये जारी केला जाईल. 

हे ही वाचा >> Mumbai Today Whether Update: आरारारा! मुंबईत कडाक्याची थंडी, 8 वर्षानंतर पहिल्यांदाच हुडहुडी वाढली, कारण...

राज्यात लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. अर्ज करणाऱ्या महिला या राज्याच्या रहिवासी असल्या पाहिजेत. महिलांचं वय 21-65 वर्षांमध्ये असलं पाहिजे. तसच महिलांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे. अर्ज करणाऱ्या महिलांचं आर्थिक उत्पन्न 25000 रुपयांहून जास्त असू नये, हे या योजनेचे पात्रता निकष आहेत. 

    follow whatsapp