Kitchen Cleaning Tips: किचनमध्ये 'Exhaust Fan' झालाय काळाकुट्ट? काही मिनिटातच होईल पांढराशुभ्र,फक्त...

मुंबई तक

25 Nov 2024 (अपडेटेड: 25 Nov 2024, 06:20 PM)

Kitchen Cleaning Tips: किचनमध्ये साफसफाई करणं खूपच किचकट असतं. साफ सफाई करण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतरही काही वस्तू चकाचक होत नाहीत. किचनमध्ये असलेला एग्जॉस्ट फॅन काळाकुट्ट झालेला असतो.

How To Clean Exhaust Fan

How To Clean Exhaust Fan

follow google news

बातम्या हायलाइट

point

किचनमध्ये एग्जॉस्ट फॅनला काळे डाग लागलेत?

point

एग्जॉस्ट फॅन साफ कसा करणार?

point

या ट्रिक्स वापरा अन् एग्जॉस्ट फॅन करा पांढराशुभ्र

Kitchen Cleaning Tips: किचनमध्ये साफसफाई करणं खूपच किचकट असतं. साफ सफाई करण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतरही काही वस्तू चकाचक होत नाहीत. किचनमध्ये असलेला एग्जॉस्ट फॅन काळाकुट्ट झालेला असतो. पण अनेकांचं त्याकडे दुर्लक्ष होतं किंवा या फॅनची साफसफाई करणं काही लोक टाळतात. त्यामुळे किचनमध्ये असलेला एग्जॉस्ट फॅन काळा पडतो. 

हे वाचलं का?

किचनमध्ये लावलेल्या एग्जॉस्ट फॅनला काळे डागही लागतात. हे डाग सहजपणे साफ होत नाहीत. यामुळे किचनमधून बाहेर पडणारा धूर सहज बाहरे पडतो आणि काही वेळानंतर एग्जॉस्ट फॅन खराबही होतो. जर तुमच्या किचनमध्ये लावलेला एग्जॉस्ट फॅन काळा पडला असेल, तर त्याला तुम्ही या सोप्या ट्रिक्सने साफ करू शकता.

किचनमध्ये लावलेला एग्जॉस्ट फॅन साफ कसा करणार?

किचनमध्ये लावलेल्या एग्जॉस्ट फॅनला साफ करण्याआधी त्यात असलेलं वीजेचं कनेक्शन काढून टाका. त्यामुळे तुम्हाला शॉक लागणार नाही. आता या फॅनला स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने ओपन करा. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांसाठी खुशखबर! 'या' दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचे 1500?

गरम पाण्यात डिशवॉशिंग लिक्विड टाका

आता तुम्ही गॅसवर एका पातेल्यात गरम पाणी टाका. पाणी गरम झाल्यानंतर यात डिशवॉशिंग लिक्विड टाकून त्याला ढवळून घ्या. आता तुम्ही त्याला स्क्रबरच्या मदतीने कव्हर आणि फॅनवर ते पाणी टाका आणि हळूहळू साफ करा. यामुळे एग्जॉस्ट फॅनवर लागलेले डाग सहज साफ होतील. एग्जॉस्ट फॅनवर पाणी टाकण्याआधी मोटरमध्ये पाणी जाणार नाही, याची काळजी घ्या. जर मोटरमध्ये पाणी गेलं, तर फॅन जळू शकतं.

हे ही वाचा >> Optical Illusion Test: 'आज'च्या गर्दीत हरवलाय 'राज'; हिंमत असेल तर 9 सेकंदात शोधून दाखवा

या पद्धतीने चकाचक होईल एग्जॉस्ट फॅन

एग्जॉस्ट फॅनला क्लीन केल्यानंतर त्याला साफ करा आणि सुक्या कपड्यात पुसून घ्या. आता तुम्ही फॅनचे ब्लेड्स आणि कव्हरला पुन्हा एकदा फिट करा आणि यात लावलेल्या स्क्रूला चांगल्या प्रकारे टाईट करा.

    follow whatsapp