Job Vacancy 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत सध्या भरती होत आहे. विविध युवा प्रशिक्षण पदांसाठी 681 जागांवर नोकरीची ही संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे. (govt job opportunity 2024 in pune municipal corporation under chief minister yuva karya prashikshan yojana)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 12वी/ ITI उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Big Boss Marathi 5: 'जरा हटके अन् गुलीगत फटके', निक्की-अरबाजला कॅप्टन सूरज दाखवणार मराठी पॅटर्न!
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे आहे.
अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://pmc.gov.in/mr/?main=true वरून माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : Gold Price: आज गौरी आगमन! करताय सोनं खरेदी? सणासुदीला घसरल्या किंमती; 1 तोळ्याचा भाव काय?
अर्जाची लिंक
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1olRuyltwZetPbucbRfSPIBUFh3bx5qz2/view?usp=sharing
ADVERTISEMENT