Satara DCC Bank Recruitment 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सरकारी नोकरीची संधी आहे. कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) आणि कनिष्ठ शिपाई (Junior Peon) अशा दोन पदांसाठी एकूण 323 जागांवर ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण सातारा आहे. (Govt job opportunity 2024 on various posts in Satara District Central Cooperative Bank)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.1- 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.2- 1) 10वी उत्तीर्ण 2) इंग्रजी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : MVA : "...तर महाविकास आघाडी तुटली असती", पृथ्वीराज चव्हाणांचे विधान
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
- पद क्र.1- 21 ते 38 वर्षे
- पद क्र.2- 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Munawar Faruqui: 'जिथे दिसेल तिथे चोपा'; कोकणी माणसांची खिल्ली उडणाऱ्या मुनव्वरला धमकी
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांकडून 590 रूपये शुल्क आकारले जात आहे.
अधिक माहितीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.sataradccb.com/ वरून माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस! पहा हवामानाचा अंदाज
अर्जाची लिंक
https://www.sataradccb.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1BXIJhdoLFqmjF2DZ53IhbLXPDAbwRk57/view?usp=sharing
ADVERTISEMENT