Govt Job opportunity : 'न्यू इंडिया ॲश्युरन्स' कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. प्रशासकीय अधिकारी (Accounts) या पदासाठी 50 जागा, प्रशासकीय अधिकारी (Generalists) या पदासाठी 120 जागा अशा एकूण 170 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 29 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job opportunity 2024 recruitment in New India Assurance company limited on Officer post)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
- पद क्र.2: CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण] असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरतील उमेदवारांकडून 850 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.newindia.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्जाची लिंक
https://www.newindia.co.in/recruitment/list
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/12GId1_jA5cIX9Q_yNjVvkszESl5N6LPk/view
ADVERTISEMENT