Optical Illusion: सर्वात कठीण टेस्ट! 4 नव्हे, जंगलात लपलेत 16 वाघ; दम असेल तर क्लिक करून बघा

मुंबई तक

20 Dec 2024 (अपडेटेड: 20 Dec 2024, 07:12 PM)

Optical Illusion IQ Test:  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका जंगलाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. विविध विषयांवर बनवलेले अनेक फोटो इंटरनेटवर पाहायला मिळतात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यावर अनेकांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही.

Optical Illusion IQ Test, Tiger Photo

Optical Illusion IQ Test, Tiger Photo (TikTok/@HecticNick)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा इतका कठीण फोटो कधी पाहिला नसेल

point

कोण कोण शोधणार या जंगलात लपलेले 16 वाघ?

point

...तरच तुम्हाला या जंगलात लपलेले 16 वाघ शोधता येतील

Optical Illusion IQ Test:  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका जंगलाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. विविध विषयांवर बनवलेले अनेक फोटो इंटरनेटवर पाहायला मिळतात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यावर अनेकांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधणं, वाटतं तितकं सोपं नसतं..अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा फोटो एका घनदाट जंगलाचा असून या जंगलात एकूण 16 वाघ आहेत. पण फोटोकडे पाहिलं तर चारच वाघ या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे. परंतु, या फोटोत 16 वाघ आहेत. हे सर्व वाघ शोधण्यासाठी तुम्हाला 7 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत एक घनदाट जंगल आहे. या जंगलात मोठी झाडे झुडपे आहेत. झाडांची मुळेही जंगलातील रस्त्यात रुतलेली या फोटोत पाहायला मिळत आहे. तसच या जंगलाच्या फोटोत सुंदर रंगीबेरंगी फुले आहेत. पण या फुलांच्या रोपट्यांजवळ दोन मोठे वाघ आणि त्यांचे दोन बछडे असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोत चार वाघ स्पष्टपणे दिसत आहेत. पण हे खरं नाहीय. कारण या जंगलाच्या फोटोत एकूण 16 वाघ आहेत. ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, अशा लोकांनाच या फोटोत असलेले 16 वाघ शोधता येणार आहेत.

हे ही वाचा >> Sanjay Raut : "जीवाला धोका निर्माण झाला, तरी...", घराच्या रेकी प्रकरणावरून खासदार संजय राऊत संतापले

ज्या लोकांना हे वाघ शोधायचे असतील, त्यांच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर असणे गरजेचं आहे. कारण हे सर्व 16 वाघ शोधण्यात 99 टक्के लोकांना अपयश आलं आहे. पण जे लोक बुद्धीला कस लावू शकतात, त्यांना या जंगलात लपलेले 16 वाघ शोधता येणार आहे. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेले 16 वाघ शोधता आले नाहीत, त्यांना अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीय. कारण या जंगलात लपलेले 16 वाघ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या फोटोत ज्या ज्या ठिकाणी रेड सर्कल केलं आहे, त्या त्या ठिकाणी तुम्ही वाघ पाहू शकता.

हे ही वाचा >>  CM Devendra Fadnavis : "संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळणार..", सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय

    follow whatsapp