Today Horoscope In Marathi: वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याचं आकलन केलं जातं. 20 डिसेंबरला शुक्रवार आहे. शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पीत केला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्योतिष गणनेनुसार, 20 डिसेंबर (शुक्रवार) चा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही राशीच्या लोकांना छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ADVERTISEMENT
मेष राषी
आज मेष राशीच्या लोकांचं मन प्रसन्न राहील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली होईल.
वृषभ राशी
आज वृषभ राशीच्या लोकांचा दिवस चांगला राहणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल. शिक्षणाशी जोडलेल्या कार्यात यश मिळेल. नोकरी-कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी चढ-उतार पाहायला मिळू शकतं. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला राहिलं. लोकांशी उत्तम संवाद साधा. महत्त्वाच्या कामांमध्ये संयम ठेवा.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी मिळण्यासाठी चांगला योग आहे. आर्थिक उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
हे ही वाचा >> शरद पवार आणि PM मोदींच्या भेटीनंतर होणार सगळ्यात मोठा राजकीय धमाका? | Opinion
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी आजची परिस्थिती प्रतिकूल आहे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. उद्योगधंद्यात बदल होऊ शकतात.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहू शकतो. आर्थिक प्रसन्नता राहील. लोकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधा. आर्थिक लाभ होईल.
तुळा राशी
तुळा राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चढ-उतार पाहायला मिळेल. एखाद्या जुन्या मित्रासोबत दिर्घकाळानंतर बोलणं होऊ शकतं. चांगल्या संवादामुळे थांबलेली कामं पूर्ण होतील.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. व्यापारात वाढ होईल. पिकनीकला जाऊ शकता. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबात प्रगती होईल.
हे ही वाचा >> Mumbai News: भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं! शाई..दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज अन्...
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना व्यापारात नवी डील मिळू शकते. आर्थिक उत्पन्नाचे नवे साधन बनू शकतात. जुन्या सोर्सच्या माध्यमातूनही पैसे मिळू शकतात. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरीसाठी चांगला योग आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचं सहकार्य मिळेल. आरोग्य चांगलं राहील. मन प्रसन्न राहील.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी आज लव्ह लाईफ चांगली राहील. प्रेमी युगुलांसाठी आनंदाची बातमी मिळू शकते. पार्टनरची पूर्ण साथ मिळेल. नोकरीची स्थिती चांगली राहील.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. चांगली बातमी मिळू शकते. शत्रुही मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. प्रवासाचा योग आहे. जागा, वाहन खरेदी करू शकता.
टीप - सूत्रांच्या आधारावर राशी भविष्याची माहिती देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
ADVERTISEMENT