Heart Attack : अनेकदा असं समजलं जातं की, हृदयविकाराचा झटका फक्त वृद्ध (old man) लोकांनाच येतो किंवा पूर्वी फक्त वृद्ध लोकांनाच हृदयविकाराचा त्रास होत होता. वाढत्या वयामुळे आणि वृद्ध झाल्यामुळे तो त्रास होणार असं मानलं जायचं. मात्र गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. भारतातही मोठ्या प्रमाणात लोक हृदयविकारामुळे त्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढला आहे.
ADVERTISEMENT
लहान वयातच येतो झटका
फिरत असताना, बसलेले असताना तरुण हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. अगदी तरुण वयात हृदयविकाराच्या झटका येत असल्याने लोक चिंताग्रस्त आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अगदी तरुण वयात हृदयविकाराचा त्रास वाढत असल्यामुळेच लहान वयात हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो, तो आजार कसा टाळता येईल याचा विचार आता होऊ लागला आहे. त्याबाबतच क्रॅनिओफेशियल सर्जन डॉ. अनुज कुमार यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय
मेडिकलच्या भाषेत हृदयविकाराच्या झटक्याला मायोकार्डियल इन्फेक्शन असंही म्हणतात. ‘मायो’ या शब्दाचा अर्थ स्नायू असा होतो तर ‘कार्डियल’ हा हृदयाशी संबंधित आहे. तर दुसरीकडे, ‘इन्फार्क्शन’ म्हणजे अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे त्याचा त्रास होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना दीर्घकालीन नुकसानही होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणारी धमनीच्या ब्लॉकेजमुळे अचानक रक्तपुरवठा त्यामुळे हृदयाच्या स्नायूंच्या पेशी मरून जातात.
हे ही वाचा >> Mia Khalifa: पॉर्न स्टार ‘मिया’च्या Hot कॅलेंडरची ‘हॉट’ चर्चा, पण तिच्यासोबत घडलं भलतंच
उच्च रक्तदाब
हृदयविकाराचा झटका येण्यापाठीमागे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळेच हृदयाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला असतो. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांचेही नुकसान होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांचीही लवचिकता कमी होते. रक्तप्रवाह वाढल्यानंतर ऑक्सिजन आणि रक्त हृदयापर्यंत प्रचंड वेगाने पोहचत असते. जर ही परिस्थिती तुमच्या शरीरात निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो, आणि अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो.
उच्च कोलेस्ट्रॉल
अनेकांच्या शरीरामध्ये गुड कोलस्ट्रॉल बरोबरच बॅड कोलेस्ट्रॉलही असू शकते. शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉल जर शरीरात निर्माण झाले तर ते रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊ लागते. त्यामुळे रक्ताभिसरण होताना रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. रक्तप्रवाहात अडथळा आल्याने शरीराच्या अनेक भागामध्ये वेदना जाणवू लागतात. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयापर्यंत रक्त योग्यरित्या पोहोचत नाही, त्यामुळे अचानक हृदयविकाराचा धोका निर्माण वाढू शकतो.
स्मोकिंग
तुम्हाला धूम्रपान करायची सवय असेल तर त्याचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्रमाणाच्या बाहेर स्मोकिंग केल्यामुळेही तुम्हा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. धूम्रपान केल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येत असतो. त्यामुळे तुमचे हृदय कधीही बंद पडण्याची शक्यता असते.
लठ्ठपणा
लठ्ठपणामुळेही अनेक धोकादायक आजार होण्याचा धोका असतो. केवळ हृदयविकाराचा झटकाच नाही तर कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजारही होण्याची दाट शक्यता असते.
छातीत दुखणे
दडपण, जडपणा किंवा शरीरातील काही भागात घट्टपणाही जाणवू लागतो. अशा प्रकारच्या वेदना ही पोटाच्या वरच्या भागाकडे होत असते. अशी वेदना होत असेल तर ती डाव्या हाताच्या किंवा ती खांद्याकडेही जाणवू लागते. तर कधीकधी जबडा किंवा दात दुखू लागतात. श्वास घेताना त्रास होणे किंवा घाम येणे असाही त्रास होत असतो.
हार्ट अटॅक आल्यास आधी ‘हे’ करा
क्रॅनिओफेशियल सर्जन डॉ. अनुज कुमार यांनी अशी गंभीर परिस्थिती उद्धभवली तर काय करावे त्याविषयीही त्यांनी सांगितले आहे. ते म्हणतात की, पहिली गोष्ट म्हणजे अब्यॅूलन्सला कॉल करणे किंवा मदतीसाठी इतर गोष्टींची मदत घेणे, अशा गोष्टी तात्काळ करून तुम्ही आधी रुग्णालयामध्ये पोहचण्याचा प्रयत्न करा. हे करत असतानाच जवळच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा मित्राला बरोबर येण्यासही सांगणे. वाहन तयार होईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत, प्रथम रुग्णाला एस्पिरिनची गोळी द्या आणि त्याला ती चघळण्यास सांगा. ऍस्पिरिन रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठण्यास प्रतिबंध करते. रुग्णाला सोयीस्कर ठिकाणी बसण्यास किंवा झोपायला सांगा. घरामध्ये 5mg ची सॉर्बिट्रेटची गोळी असेल तर ती जिभेखाली ठेवा. जर रुग्ण शुद्धीत नसेल तर त्याला काहीही देण्याचा प्रयत्न करू नका. कारण रुग्णाला श्वास घेता येत नसेल किंवा नाडी सापडत नसेल तर लगेच प्रथमोपचाराची तयारी करी. वेळेत रुग्णवाहिका आलीच तर तात्काळ रुग्णालयात जा. जर जवळच्या हॉस्पिटलचा तुमच्याकडे नंबर असेल, तर त्यांना अशा रुग्णाची माहिती द्या, त्यामुळे त्या रुग्णालय व्यवस्थापनाला रुग्णासाठी पुढची तयारी करता येईल.
ADVERTISEMENT