Mazi ladki bahin yojana online form : एक रुपयाही खर्च न करता घरीच भरा अर्ज! जाणून घ्या कसं? 

मुंबई तक

06 Jul 2024 (अपडेटेड: 06 Jul 2024, 01:21 PM)

Mazi ladki bahin yojana 2024 online apply link nari shakti doot app : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट सरकारने जाहीर केलीये. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालीये. पण, अर्ज कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात... याचबद्दल सर्व माहिती वाचा... (Majhi ladki bahin yojana online apply App Details)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नारीशक्ती दूत अ‍ॅपवरून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?

point

माझी लाडकी बहीण योजनेची सगळी माहिती

point

माझी लाडकी बहीण अर्ज कसा भरायचा?

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra online apply : मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलैपासून लागू करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, अनेकांना अर्ज कसा भरायचा, याबद्दल माहिती नाहीये. अनेक जण पैसे देताहेत, पण एक रुपयाही खर्च न करता अर्ज कसा करायचा हे समजून घ्या. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Documents, online apply and pdf form)

हे वाचलं का?

Mazi ladki bahin yojana app download : नारीशक्ती दूत अ‍ॅप 

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. या अ‍ॅपचे नाव आहे नारीशक्ती दूत. 

अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. अटी आणि शर्थी वर क्लिक करा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा. 

चार अंकी ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल. तो भरा आणि व्हेरीफाय ओटीपी यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमचे प्रोफाईल भरा. म्हणजे नाव, गाव, जिल्हा, पत्ता, अशी सगळी विचारलेली माहिती भरा. नारीशक्ती या रकान्यात सामन्य महिला हा पर्याय निवडा.

हेही वाचा >> खासदार वायकर घोटाळ्यातून सुटले! पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक कारण

अर्ज भरून झाल्यानंतर महिलांच्या योजना यावर क्लिक करा. त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेच्या पर्यायावर क्लिक करा. 

त्यानंतर संपूर्ण अर्ज भरा. यात नाव, पतीचे नाव, जन्म तारीख, पत्ता अशी सगळी माहिती भरा. 

त्यानंतर आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे अपलोड करा. यात आधार कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आदी. आणि नंतर फॉर्म सबमिट करा. 

माझी लाडकी बहीण योजना : पात्रतेचे निकष

1) महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. 
3) 21 वर्ष ते 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.
4) अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक. 
5) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण अपात्र?

1) कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक असणाऱ्या महिला. 
2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
3) कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असलेल्या महिला. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी पात्र असतील.

हेही वाचा >> नगरसेवकाला बाथरुममध्ये बोलावलं अन् गुप्तांगच कापून टाकलं, डॉक्टर महिलेने...

4) शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे 1500 रुपये जास्त लाभ घेत असलेली महिला. 
5) कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे अशी महिला. 
6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत. 
8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर कोणती कागदपत्रे द्यावी लागणार?

1) ऑनलाईन अर्ज

2) आधार कार्ड

3) महाराष्ट्रात असल्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म दाखला.

4) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. 

5) बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत. 

6) पासपोर्ट आकाराचा फोटो

7) शिधा पत्रिका (रेशन कार्ड)

8) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पीडीएफ अर्ज कसा भरायचा?

- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.

- भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.

हेही वाचा >> मोदींनंतर कोण होणार पंतप्रधान, जोतिषशास्त्र काय सांगतंय?

- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. 

क्लिक करू अर्ज डाऊनलोड करा... View PDF

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर...

1) रेशन कार्ड
2) मतदार ओळखपत्र 
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 
4) जन्म दाखला 

इतर राज्यातील कोणत्या महिला पात्र?

- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. 

Mazi Ladki Bahin Yojana Documents : उत्पन्नाचा दाखला नसेल, तर काय?

- अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, तर ज्यांच्या पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. ते रेशन कार्ड जोडून अर्ज भरतात. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

    follow whatsapp