How To Remove Worm Form Cabbage: फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व असतात. फ्लॉवरची भाजीही अनेकांना आवडते. विशेषत: हिवाळी हंगामात लोकांना फ्लॉवरची भाजी, फ्लॉवरचे पराठे, फ्लॉवरचे पकोडे खायला आवडतात. परंतु, फ्लॉवरमध्ये किडे असल्याने आरोग्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. फ्लॉवरमध्ये असलेले किडे तीक्ष्ण नजरेने पाहिल्यावरच दिसतात. त्यामुळे अनेक लोक फ्लॉवर खायला घाबरतात. पण आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत, या ट्रिक्सचा वापर करून फ्लॉवरमध्ये अडकलेल्या किड्यांचा नायनाट होऊ शकतो.
ADVERTISEMENT
या ट्रिक्सने फ्लॉवरमधील किड्यांचा होईल नायनाट
स्टेप 1
सर्वात आधी फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करा आणि या तुकड्यांना नीट पाहा. असं केल्याने फ्लॉवरमधील मोठे किडे निदर्शनास येतात आणि त्यांना साफ करणं खूप सोपं होतं.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! नव्या वर्षात 'या' तारखेला मिळणार 2100? मोठी अपडेट आली समोर
स्टेप 2
आता फ्लॉवरच्या या तुकड्यांना एखाद्या भांड्यात भरा आणि काही वेळ पाण्याच्या खाली ठेवा. त्यानंतर या फ्लॉवरच्या तुकड्यांना हलवत राहा. असं केल्यानेही फ्लॉवरमध्ये अडकलेले किडे बाहेर निघू शकतात.
स्टेप 3
एका भांड्यात पाणी भरा आणि ते पाणी उकळा. या उकळत्या पाण्यात एक चमच मीठ आणि एक चमच हळद टाका आणि त्यानंतर यात फ्लॉवरचे तुकडे 20 मिनिटांपर्यंत ठेऊन द्या. असं केल्याने फ्लॉवरमधील एक एक किडा साफ होऊ शकतो.
हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis: "दहा हजार लोकांना रोजगार..." ; वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांचं मोठं विधान!
ADVERTISEMENT
