How To Store Milk Without Fridge : गरमीच्या मोसमात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या मोसमात खाण्या पिण्याच्या गोष्टी स्टोअर करून ठेवणं खूप कठीण असतं. भाजी, फळं, दूध फ्रिजमध्ये ठेवल्यावर फ्रेश राहतात. पण एखाद्या दिवशी फ्रिज बंद झाला, तर फ्रिजमध्ये ठेवलेलं दूध नासतं. पण तुम्ही फ्रिज नसताना गरमीतही हे दूध फ्रेश ठेऊ शकता.
ADVERTISEMENT
फ्रिजशिवाय दूध कसं करणार स्टोअर?
याबाबत शशांक अलशी नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत शंशांक सांगतो की, तुमचं फ्रिज बंद झालं असेल आणि तुम्हाला दूध स्टोअर करायचं असेल, तर सर्वात आधी एक मोठ्या भांड्यात दुधाला उकळून घ्या. यानंतर ते दूध थंड करा. दूध जेव्हा पूर्णपणे थंड होईल, तेव्हा दुसऱ्या मोठ्या भांड्यात पाणी भरा आणि या पाण्यात दूधाचं भांड ठेऊन द्या. याप्रमाणे दूध फ्रिज नसतानाही दोन दिवस फ्रेश राहू शकतं.
हे ही वाचा >> Kitchen Tips : 2 दिवसातच सुकतात लिंबू? 'या' खास टीप्स फॉलो करा, Lemon राहतील ताजे आणि फ्रेश
अशाप्रकारे स्टोअर केलेलं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं का?
आहार तज्ज्ञ शुभा रमेश एल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही दूध दोन दिवस स्टोअर करून ठेवलं, तर दोन्ही दिवस दूध उकळून ठेवा. दूध उकळल्यानंतर यामध्ये असलेले बक्टेरिया मरून जातात. दुधाला उकळल्यानंतर तुम्ही मायक्रोबियल भार कमी करू शकता.
अशाप्रकारे फ्रिज शिवाय दूध स्टोअर केल्यानंतर ते ताजं राहतं. तसच तुम्ही दुधाच्या भांड्याला एखाद्या जाळीदार भांड्यात झाकून ठेऊ शकता. जर गरमी अधिक असेल, तर अशा परिस्थितीत दूध खराव होण्याची शक्यता असते. या दूधाचं सेवन करण्यापूर्वी योग्य प्रकारे ते तपासून बघा.
ADVERTISEMENT