Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी गोड होणार, कुणाच्या खात्यात 5500 रूपयांचा बोनस येणार?

मुंबई तक

• 02:28 PM • 16 Oct 2024

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले होते.त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली होती.

ladki bahin yojana diwali bonus in october 2024  which women will get a bonus of Rs 5500 in their account

'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी होणार गोड

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींचा दिवाळी गोड होणार

point

दिवाळी आधीच बोनस मिळणार

point

कुणाच्या खात्यात पैसे जमा होणार?

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा झाला होता. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा असा एकत्रितपणे 3000 रूपयाचा निधी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच भाऊबीजेच भेट दिली होती. या भेटीनंतर आता सरकार आणखी 2500 रूपये काही महिलांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे महिलांची दिवाळी आणखी गोड होणार आहे. (ladki bahin yojana diwali bonus in october 2024 which women will get a bonus of Rs 5500 in their account)

हे वाचलं का?

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले होते.त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली होती. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'नो 5500 रूपये कसे येणार खात्यात?

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी बोनस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा बोनस जमा करण्यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या होत्या. या अटीत बसणाऱ्या महिलांनाच दिवाळी बसणार आहे. 

'या' महिलांना दिवाळी बोनस मिळणार? 

 ज्या महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत आहे. ज्या महिलांनी योजनेतून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला आहे. ज्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे. आणि या योजनेत सर्व नियम आणि अटींचं पालन केले आहे, अशा महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे. 

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. हे पैसे कसे तपासायचे, हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तुम्हाला 5500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार?

खात्यात पैसे जमा झाल्याचे कसे कळणार? 

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी तपासू शकता. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे. यासोबत योजनेचे पैसै खात्यात आल्यानंतर तुम्हाला फोनवर मेसेज देखील येतो. जर मेसेल आला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पासबूकही तपासू शकता. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे. 

    follow whatsapp