Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर लगेचच आता चौथा आणि पाचवा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर महिलांना गुडन्यूज मिळाली आहे. पण चौथ्या आणि पाचव्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme fourth and firth installement but how much money will be deposite in women account)
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात काही महिलांच्या खात्यात 4500 तर काही महिलांच्या 1500 रूपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता लगेचच महिलांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना नेमके किती पैसे मिळणार आहेत. हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 2 कोटी महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का?
3 हजार रूपये कुणाला मिळणार?
ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित मिळून 4500 जमा झाले होते. त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित पणे 3000 रूपये जमा होणार आहे. यासह जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रूपयाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यात त्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले होते. आता या महिलांच्या खात्यात देखील ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित मिळून 3000 जमा होणार आहेत.
7500 कुणाच्या खात्यात येणार?
ज्या महिलांनी सप्टेंबर आधी अर्ज केले आहेत.पण त्यांच्या खात्यात अद्याप एकही महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. त्यांच्या खात्यात आता जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे एकत्रितपणे 7500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात आले देखील आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे आले नाहीयेत त्या महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबरआधी पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसात आपलं बँक पासबूक आणि बँक खातं चेक करावं.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : फक्त 'याच' महिलांच्या खात्यात 3000 होणार जमा, तुमच्या बँकेत येणार का?
दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT