Ladki Bahin yojana: अर्ज मंजूर झालाय, पण Village, Ward लेव्हल पेंडिंग; 3000 मिळणार की नाही?

मुंबई तक

• 08:44 PM • 06 Sep 2024

Mukhyamantri ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि त्याच्या खात्यात पैसेही जमा व्हायला सुरूवात झाली आहेत. तर काही महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत. जिल्हा पातळीवर हे अर्ज मंजूर दाखवत आहेत.पण गावपातळीवर आणि वॉर्ड लेव्हलला हे अर्ज पेडींग दाखवत आहेत.

 ladki bahin yojana women application approve in district levele village and ward level showing pending women get 3000 or not mukhymantri ladki bahin yojana scheme

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलांचं अर्ज हा अप्रुव्ह झालाय

point

पण गाव आणि वॉर्ड लेव्हलवर पेंडिंग दाखवतोय

point

योजनेचे पैसे येणार की नाही?

Mukhyamantri ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहे. मात्र तरी खात्यात पैसे येणार की नाही, असा संभ्रम नागरीकांमध्ये आहे. यामागचं कारण म्हणजे महिलांचं अर्ज हा अप्रुव्ह झालाय पण गावपातळीवर (Village) आणि वॉर्ड लेव्हलला अर्ज पेडींग दाखवत अशा परिस्थितीत महिलांना योजनेचा लाभ मिळणार की नाही? महिलांच्या खात्यात 3000 येणार की नाही? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana women application approve in district levele village and ward level showing pending women get 3000 or not mukhymantri ladki bahin yojana scheme)  

हे वाचलं का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि त्याच्या खात्यात पैसेही जमा व्हायला सुरूवात झाली आहेत. तर काही महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत. जिल्हा पातळीवर हे अर्ज मंजूर दाखवत आहेत.पण गावपातळीवर आणि वॉर्ड लेव्हलला हे अर्ज पेडींग दाखवत आहेत.याचा सरळ अर्थ इतकाच आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी तुमचा अर्ज हा मंजूर केला आहे. त्यामुळे गाव पातळीवर आणि वॉर्ड लेव्हलला तुमच्या अर्ज मंजूरीची गरज नाही. 

हे ही वाचा : Gulabrao Patil : ''अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही'', शिंदेंच्या मंत्र्याचा अजितदादांच्या खात्यावर निशाणा

पण यात विशेष बाब म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करता आणि यापुर्वी अर्ज केलेल्या पर्यायावर क्लिक करता. तेव्हा तुमच्या अर्जावर अप्रुव्हल असा जर मेसेज असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. फक्त याबाबतची अधिकृत तारीख झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे येतील. 

त्यामुळे तुमच्या अर्जातही जिल्हा लेव्हलर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, असे दाखवत असेल आणि गाव पातळीवर आणि वॉर्ड लेव्हलवर अर्ज पेंडींग दाखवत असला तरी तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे. त्यामुळे टेन्शन सोडा आणि पैशाची वाट पाहा. 

सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार 

ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे त्या महिलांना दिलासा मिळाला आहे. पण या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे.  कारण ज्या महिलांना सप्टेंबरआधी अर्ज करता आला नाही आहे,  त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी म्हणजेच 3000 रूपये मिळणार नाहियेत. त्यामुळे त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे. जर त्या महिलांनीच आधीच अर्ज केले असते, तर त्यांना 3000 रूपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते. 

    follow whatsapp