Majhi Ladki bahini yojana Application Form Update : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. 1 जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. महिलांचा या योजनेला उत्सफूर्द असा प्रतिसाद मिळत असून अर्ज करण्यासाठी त्यांची गर्दी होत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राज्यभरात सेतू केंद्र, आपले सरकार तसेच अंगणवाडी केंद्रात महिलांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. (majhi ladki bahin yojana now application form will be uploaded within few minutes new website launched)
ADVERTISEMENT
पण, अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे ठिकठिकाणी महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकाच वेळी अनेक अर्ज भरले जात असल्याने अनेकदा सर्व्हर डाऊन,संकेतस्थळ बंद सारख्या समस्या येत आहेत. ही वस्तूस्थिती पाहता, सरकारने आता नवीन वेबसाईट सुरू केली असून महिलांना आता हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही पटापट भरता येणार आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस; IMD चा सतर्कतेचा इशारा
कोणत्या वेबसाइटवरून महिलांना झटपट करता येणार अर्ज?
माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहायता प्रदान करणार आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर महिला ऑफलाईन किंवा नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करत होत्या. पण, तांत्रिक समस्या लक्षात घेता सरकारने अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइट सुरू केली आहे.
हेही वाचा : माढ्यात मोहितेंनंतर पवारांचा दुसरा डाव! अजितदादांना धक्का, शिंदेंना घरातूनच चॅलेंज?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने आता www. ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. यामुळे महिलांना गाव, वॉर्ड, तालुक्याची निवड करणे सोपे होणार आहे.
'लाडकी बहीण' योजनेसाठी फक्त 'या' महिलाच पात्र असणार!
राज्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे. या योजनेसाठी महिलांनी अर्ज केल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळेल. याशिवाय, ज्या महिलेने या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. त्यांनाच योजनेचा पहिला हप्ता मिळेल. अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
हेही वाचा : Pimpari Chinchwad Video : बाहुली घेऊन खेळत होती, अंगावर लोखंडी गेट पडला अन्...चिमुकलीसोबत काय घडलं?
कोणत्या महिला ठरणार अपात्र?
ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील. घरात कोणी Tax भरत असेल, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल किंवा कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर त्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ADVERTISEMENT