Mazi Ladki Bahin Yojana: ...तरच 4500 रुपये मिळणार, सरकारचा नवा GR पाहिला का?

मुंबई तक

10 Sep 2024 (अपडेटेड: 10 Sep 2024, 10:54 PM)

Mazi Ladki Bahin Yojana GR: माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक नवा जीआर आला आहे. जाणून घ्या यामध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे.

...तरच 4500 रुपये मिळणार, सरकारचा नवा GR पाहिला का?

...तरच 4500 रुपये मिळणार, सरकारचा नवा GR पाहिला का?

follow google news

बातम्या हायलाइट

point

खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार

point

माझी लाडकी बहीण योजनेचा नवा शासन निर्णय

point

केवळ अंगणवाडी सेविकांनाच अर्ज स्वीकारण्याचे अधिकार

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण असं असलं तरी सरकारने आता नुकताच एक नवा जीआर आणला आहे. ज्यामुळे ऑफलाइन अर्ज भरणाऱ्या महिलांनी जीआरमधील एक गोष्ट पाळली नाही तर त्यांना 4500 हजार रुपये मिळणार नाहीत. (mazi ladki bahin yojana if you submit an application to anganwadi workers you will get rs 4500 have you seen the new gr of government)

हे वाचलं का?

ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर महिन्यासाठी पात्र ठरतील त्यांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत. मात्र, ऑफलाइन अर्ज भरताना महिलांना एक गोष्ट ही कटाक्षाने पाळावी लागणार आहे. ती म्हणजे महिलांना त्यांचा अर्ज हा फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच जमा करायचा आहे. ऑफलाइन अर्ज हा आता इतर कुठेही भरता येणार नाही.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : 'या' दिवशी 4500 महिलांच्या खात्यात डिपॉझिट होणार?

नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, "समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.  

मात्र आता यापैकी केवळ अंगणवाडी सेविकांनाच अर्ज स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेचा नवा शासन निर्णय (GR)जसाच्या तसा...

"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत.

महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक- मबावि - २०२४/प्र.क्र. ९६/का-२

नविन प्रशासन भवन, तिसरा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२४.

संदर्भ :- महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र.मबावि - २०२४/प्र.क्र.९६/का-२, दि.२८.०६.२०२४, दि.०३.०७.२०२४, दि.१२.०७.२०२४, दि.२५.०७.२०२४ व दि.०२.०९.२०२४

प्रस्तावना :- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : नवीन फॉर्म भरून झटपट मिळवा 4500 रूपये?

शासन निर्णय दि.०२.०९.२०२४ अन्वये "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता, सदर योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास संदर्भाधीन दि. ०२.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. 

या योजनेंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दि.१२.०७.२०२४ व दि.२५.०७.२०२४ अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, "समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. 

आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे. सबब, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात येत आहे.
 

    follow whatsapp