Sharad Pawar on maharashtra assembly election 2024 results: कराड: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड असं बहुमत दिलं. तर दुसरीकडे महविकास आघाडीची मात्र अक्षरश: धूळधाण झाली. तीन पक्षांना मिळून 50 चा आकडा देखील यावेळी गाठता आला नाही. दरम्यान, या निकालानंतर आज (24 नोव्हेंबर) शरद पवार यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. (see sharad pawar big statement on maharashtra assembly election 2024 results what exactly he said)
ADVERTISEMENT
'निकाल काय लागला काल... आणि मी आज कराडमध्ये आहे. या निकालानंतर सुद्धा एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसणार नाही...', असं म्हणत शरद पवार यांनी पुन्हा एकदा लोकांमध्ये जाऊ असं म्हणत कंबर कसली आहे.
पाहा निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
'असा अनुभव आम्हाला कधी आलेला नव्हता'
'आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निकाल नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय नाही. त्यामुळे माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. तोपर्यंत आताची जी व्यवस्था आहे त्यावर भाष्य करू इच्छित नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष आम्ही सामाजिक जीवनात आहोत. पण असा अनुभव आम्हाला कधी आलेला नव्हता.'
हे ही वाचा>> Maharashtra Election Full list of winners: 288 मतदारसंघांचा संपूर्ण निकाल, पाहा तुमचा आमदार कोण
'पण हा अनुभव आला.. आता आलाय तर त्याचा अभ्यास करणं.. त्याची कारणमीमांसा नक्की काय समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन उभं राहणं. मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. प्रश्न तो नाही..'
'सत्तेत पुन्हा आलो नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल, असा त्यांनी प्रचार केला'
'जी माहिती आम्ही घेतोय.. लाडकी बहीण योजनेबाबत ठिकठिकाणी ऐकायला मिळतंय की, हे एक महत्त्वाचं कारण आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्कमही देण्यात आली. त्याचा प्रचार असाही करण्यात आला की, आम्ही सत्तेवर नसलो तर ही योजना बंद होईल.'
हे ही वाचा>> Rohit Pawar : रोहित पवार पिछाडीवर पडल्याच्या धक्क्यात 75 वर्षांच्या समर्थकाचा मृत्यू, ट्विट करुन...
'ही योजना बंद होईल याची चिंता ज्या वर्गाला होती त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं. असं प्रथमदर्शनी दिसतंय.' असं म्हणत शरद पवारांनी या योजनेबाबत भाष्य केलं.
'योगींच्या बटेंगे तो कटेंगे.. या घोषणेमुळे मतांचं धुव्रीकरण'
'मतांचं धुव्रीकरण हे निश्चितच झालं... हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री.. त्यांनी जे भाष्य केलं त्यामागे धुव्रीकरण व्हावं असाच हेतू प्रथमदर्शनी दिसतोय.' असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
'...म्हणून युगेंद्रला अजित पवारांविरुद्ध उभं केलं'
'अजित पवारांच्या जागा जास्त आल्या आहेत हे काही अमान्य करण्याचं कारण नाही. पण राष्ट्रवादी हा पक्ष आणि त्याचा संस्थापक कोण आहे हे साधारणत: महाराष्ट्रात माहीत असावं.'
'बारामती असा बदल का केला हे पाहावं लागेल ते तपासून पाहावं लागेल.'
'कोणी तरी उभं राहायला हवं त्या मतदारसंघात.. समजा उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता? त्यामुळे कोणी तरी निवडणूक लढवण्याची गरज होती. आम्हाला माहिती होतं की, ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार यांचं येथील संघटन, सत्तेतील त्यांचं स्थान हे एका बाजूला.. आणि एक नवखा तरुण एका बाजूला.. त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती.' असं म्हणत पवारांनी बारामतीमधील राजकारणावर भाष्य केलं.
'मी काही घरी बसणार नाही...'
'निकाल काय लागला काल... आणि मी आज कराडमध्ये आहे. या निकालानंतर सुद्धा एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसणार नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आमच्यासोबत काम करते किंवा करू इच्छिते त्यांना या सगळ्यांना हा अनुभव नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या दमाने ही नवी कर्तृत्ववान पिढी उभी राहिली पाहिजे. आत्मविश्वास दिला पाहिजे हा माझा कार्यक्रम आहे.' असं म्हणत शरद पवारांनी पुन्हा संघर्ष करणार असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT