Rule Change : नोव्हेंबरमध्ये बँकांना किती दिवस सुट्टी? क्रेडिट कार्ड ते LPG चे दर, होणार मोठे 5 बदल

मुंबई तक

28 Oct 2024 (अपडेटेड: 28 Oct 2024, 05:22 PM)

LPG Gas Price Rule changes: नोव्हेंबर महिना सुरू होणार असून, कॅलेंडरच्या पानासोबतच अनेक गोष्टी बदलणार आहेत. यातील बहुतांश बदल हे थेट तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असणार आहेत.

1 नोव्हंबरपासून कोणते नियम बदलणार?

1 नोव्हंबरपासून कोणते नियम बदलणार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

नोव्हेंबरमध्ये बँका 13 दिवस बंद राहणार

point

घरघुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढणार?

point

SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होणार? 

LPG Rule Changes: लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार असून, कॅलेंडरच्या पानासोबतच अनेक गोष्टी बदलणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या अनेक गोष्टींचा तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट फरक पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये LPG Cylinder च्या किमतीपासून ते थेट क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक गोष्टींचे नियम बदलण्याची शक्यता आहे. नेमके काय काय बदल होऊ शकतात पाहुयात. (Rules Changing from 1 November and Bank Holidays during Diwali and election)

हे वाचलं का?

 

1. बँका 13 दिवस बंद राहणार

 

नोव्हेंबरमध्ये दिवाळी आणि त्याचसोबतचे इतर सण आणि सार्वजनिक सुट्ट्या, तसेच विधानसभा निवडणुकांमुळे बँका बरेच दिवस बंद राहणार आहे. नोव्हेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांचं गणित केल्यास तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची कामं शक्य तेवढ्या लवकर करुन घेणं योग्य ठरेल. त्यानंतर इतर कामांसाठी तुम्हाला ऑनलाईन बँकिंगचा पर्याय खुला असणारच आहे.  

2. घरघुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढणार?

हे ही वाचा >>Numerology: जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील कोणते वर्ष असेल खूप शुभ अन् कोणतं वर्ष...

 

दरमहिन्याप्रमाणे या महिन्याच्या सुरूवातीलाही वेगवेगळ्या कंपन्यांच्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीतही वाढ होणार आहे. 14 किलोच्या घरघुती वापराच्या सिलेंडरची किंमत कमी होण्याची सगळेच वाट पाहतायत. गेल्या अनेक दिवसांपासून या किमती स्थिर आहेत. तर 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत जुलै महिन्यात घट झाली होती. मात्र त्यानंतर किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये तब्बल 94 रुपयांची वाढ झाली. 

3. SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होणार? 

 

1 नोव्हेंबरपासून देशात आणखी एक महत्वाचा बदल होणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकार बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेशी संबंधीत हा बदल आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सब्सिडी SBI कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. यामुळे युटिलिटी बिल पेमेंट आणि फायनान्स चार्जेसमध्ये बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्डमध्ये दरमहा 3.75 रुपायंचा फायनान्स चार्च लागू होईल. तसंच वीज, पाणी, एलपीजीसह वेगवेगळ्या युटिलिटी सर्व्हिसच्या 50 हजार रुपयांवरील पेमेंटसाठी अधिकचा 1 टक्का एक्स्ट्रा दर भरावा लागणार आहे. 

4. Mutual Funds चे नियम 

 

मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) म्युच्यूअल फंड आणि इनसाईड ट्रेडिंगच्या नियमांमध्ये बदल करण्याचं ठरलवलं आहे. यामध्ये काही नियम हे कठोर केले जाण्याची शक्यता आहे. या नवीन बदलांनुसार आता अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या फंडमध्ये नॉमिनी असणाऱ्यांना तसंच त्यांच्या नीकटवर्तीयांना 15 लाखांवरील व्यवहारासाची माहिती ही अनुपालन अधिकाऱ्याला (compliance officer) द्यावी लागणार आहे. 

5. टेलिकॉम क्षेत्रात नवा नियम

 

हे ही वाचा >>Ratan Tata Property : रतन टाटांची 10 हजार कोटींची संपत्ती कोणाला मिळाली? नाव वाचून थक्कच व्हाल

 

एक नोव्हेंबरपासून होणाऱ्या बदलांमध्ये सहाव्या क्रमांकावर टेलिकॉम क्षेत्रातील बदल आहे. सरकारने JIO, Airtel सह सर्व कंपन्यांना मेसेज ट्रेसेबिलिटी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामाध्यमातून मेसेज कुणी पाठवला आणि तो कुणापर्यंत पोहोचला हे जाणून घेण्याची अधिकार प्राप्त होतात. त्यामुळे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Trai) ने बँका, वित्तीय संस्था आणि ई-कॉमर्स फर्म्स सारख्या सर्व प्रमुख संस्थांकडून (PEs) सर्व मेसेजची ट्रेसेबिलिटी 1 नोव्हेंबर 2024 पासून ऑन करण्याचे निर्देश दिलेत.


 

    follow whatsapp