Rahul Kul Daund Vidhan Sabha पुणे : दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार राहुल कुल यांचा काल जाहीर झालेल्या निकालामध्ये विजय झाला. त्यांच्या या विजयाचा मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र इथेच एक दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. विजयाचा आनंद साजरा करत असताना एका समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
राज्यात काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. राज्यात महायुतीचे तब्बल 233 आमदार आले आहेत. त्यामध्ये दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांचाही समावेश आहे. राहुल कुल यांच्या विजयानंतर दौंडमध्ये तुफान जल्लोष करण्यात आला. यावेळी बाळासाहेब भोसले यांनी तुफान जल्लोष केला. यादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा >> Santosh Bangar : शिंदेंचे आमदार संतोष बांगर समर्थकांचा भाजप जिल्हाध्यक्षाच्या घरावर हल्ला; तलवार, बंदूक...
दौंड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा भाजपचे उमेदवार राहुल कुल आघाडीवर होते. तेव्हाच त्यांच्या समर्थकांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दौंड शहरातील शासकीय गोदामाजवळ लोकांनी मोठी गर्दी केली होती.
गार गावातील अंकुश भोसले हे देखील आमदार राहुल कुल यांच्या विजयोत्सवात सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत राहुल कुल यांनीही शोक व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT