Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारचा प्रचंड मोठा निर्णय, थेट GR करा डाऊनलोड!

मुंबई तक

02 Sep 2024 (अपडेटेड: 02 Sep 2024, 09:53 PM)

Mazi Ladki Bahin Application Last Date: माझी लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा जीआर देखील आता समोर आला आहे.

Mazi Ladki Bahin Yojana: थेट GR करा डाऊनलोड!

Mazi Ladki Bahin Yojana: थेट GR करा डाऊनलोड!

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा नवा निर्णय

point

महिला लाभापासून वंचित राहणार नाहीत

point

शिंदे सरकारने अर्ज करण्याची मुदत वाढवली

Mazi Ladki Bahin Yojana New GR: मुंबई: माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना ठरली असून ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात गेमचेंजर ठरणारी असू शकते. त्यामुळेच सरकार देखील या योजनेबाबत आता अधिकच जागरूक झाली आहे. महाराष्ट्रात अद्यापही विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. याच गोष्टीचा फायदा हा राज्यातील सरकारला होऊ शकतो. कारण यामुळेच माझी लाडकी बहीण योजनेला आता आणखी मुदतवाढ देण्याचा अत्यंत मोठा निर्णय हा नुकताच घेण्यात आला आहे. (shinde govt big decision application deadline extended for mazi ladki bahin download gr directly)

हे वाचलं का?

शिंदे सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेच्या नोंदणीची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 होती. पण आता नोंदणी प्रक्रियाला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana: महिलांना 3000 रुपये मिळणार की नाही?, सर्वात मोठी बातमी आली समोर

Mazi Ladki Bahin Yojana साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बदलली

शासनाने जारी केलेल्या नव्या जीआर नुसार आता राज्यातील महिलांना अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे. जी सप्टेंबर 2024 महिन्यापर्यंत असणार आहे. त्यामुळे राज्यातील ज्या महिला या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करू शकल्या नाहीत त्यांना आता सरकारने आणखी एक संधी दिली आहे.

हे ही वाचा>> Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमचे फोटो म्हणजे कहर, पण त्यांची कहाणी म्हणजे...

Mazi Ladki Bahin Yojana बाबत सरकारचा नवा जीआर जसाच्या तसा... 

"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक- मबावि - २०२४/प्र.क्र. ९६/का-२

नविन प्रशासन भवन, तिसरा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक- ०२ सप्टेंबर, २०२४.

वाचा:-  महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र.मबावि-२०२४/प्र.क्र.९६/का-२ दि.२८.०६.२०२४ व दि.०३.०७.२०२४

प्रस्तावना :-

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शासन निर्णय दि.०३.०७ २०२४ मधील परिच्छेद (ड) मध्ये सदर योजनेत आता दि.३१.०८.२०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१.०८.२०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१.०७.२०२४ पासुन दरमहा रु. १५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या माहिमेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दि.३१.०८.२०२४ नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, या योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.”

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०९०२१८१०५७०३३० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. अनुपकुमार यादव)
सचिव, महाराष्ट्र शासन

    follow whatsapp