What is Sexual Harassment? : आजच्या काळात महिला कुटुंब आणि कामाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत. त्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाने मोलाचे योगदान देताना दिसतात. परंतु, त्यांना धडपड करत इतर संकटांचा सामनाही करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे, ‘लैंगिक छळ’. काही महिलांना याबद्दल कल्पानाही नसते. यासाठी लैंगिक छळाचा (Sexual Harassment) नेमका अर्थ आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. (What is Sexual Harassment Know about it in detail)
ADVERTISEMENT
लैंगिक छळ म्हणजे काय?
सहमती नसलेल्या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक क्रियांना लैंगिक छळ म्हणतात. ही लैंगिक क्रिया पूर्णपणे एखाद्याच्या इच्छेविरुद्ध केली जाते. यामध्ये तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा शारीरिक संपर्क करणे समाविष्ट आहे. हा लैंगिक छळ केवळ महिलांसोबतच नाही तर लहान मुलं आणि पुरुषांसोबतही होऊ शकतो.
वाचा: Maratha Reservation : ‘उपोषणादरम्यान जीवाला धोका निर्माण झाल्यास…’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होणे म्हणजे काय?
2013 मध्ये, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा मंजूर झाला. ज्या संस्थांमध्ये दहापेक्षा जास्त लोक काम करतात त्यांना हा कायदा लागू होतो. हा कायदा 9 डिसेंबर 2013 रोजी लागू झाला. याचे नावच, त्याचा उद्देश प्रतिबंध, निषेध आणि निवारण स्पष्ट करते. उल्लंघन झाल्यास पीडित व्यक्तीला त्याचे निराकरण करण्याचे काम करते.
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची वाढती प्रकरणं!
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची प्रकरणं वाढण्याचे कारण म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही कामाच्या ठिकाणी समान काम करत आहेत. दुर्दैवाने, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ ही नोकरदार महिलांसाठी एक सामान्य समस्या बनली आहे. देशातील कोणत्या ना कोणत्या कार्यालयात दररोज कोणत्या ना कोणत्या स्त्रीला या समस्येचा सामना करावा लागतो. एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की तक्रारी दाखल न करण्याची मुख्य कारणे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास नसणे, करिअरची चिंता आणि आरोपीला शिक्षा न होणे.
वाचा: Beed : टाकीवरून उडी मारून मराठा तरूणाची आत्महत्या, आरक्षणासाठी संपवलं जीवन
लैंगिक छळाची तक्रार कुठे करता येते?
तुमच्या संस्थे (office) अंतर्गत तक्रार समिती असल्यास, तिथे तक्रार करता येते. 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या अशा सर्व संस्थांअंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. संस्थेने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नसेल तर पीडित व्यक्ती स्थानिक तक्रार समितीकडे तक्रार करू शकते. दुर्दैवाने, अनेक राज्य सरकारांनी या समित्या पूर्णपणे स्थापन केलेल्या नाहीत आणि बहुतेक प्रकरणांमध्ये कोणाशी संपर्क साधावा याची माहिती सार्वजनिक केली जात नाही.
तक्रार दाखल करताना, घटनेपासून तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा आणि जर एकापेक्षा जास्त घटना घडल्या असतील तर, पीडितेकडे शेवटच्या घटनेच्या तारखेपासून तक्रार करण्यास तीन महिने आहेत.
लैंगिक छळाच्या आरोपी व्यक्तीला कायद्यात कोणत्या शिक्षेची तरतूद आहे?
आरोपी व्यक्तीला तीन वर्ष कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. हा जामीनपात्र, दखलपात्र गुन्हा आहे आणि कोणत्याही दंडाधिकार्याद्वारे न्यायपात्र आहे.
याचा सोपा अर्थ IPC (भारतीय पॅनेल कोड) कलम 354 नुसार समजून घेऊयात. येथे या कलमात, महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करून तिच्यावर हल्ला करणे यासारख्या घटनांचा समावेश केला आहे, ज्या अंतर्गत आरोपीला 1 वर्षाचा तुरुंगवास, 5 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड होऊ शकतो. परंतु आता अपराधिक कायदा (सुधारणा) कायदा, 2013 (Sexual Harassment Act) द्वारे कलम 354 चे अनेक उपकलम तयार केले गेले आहेत आणि त्यात 354 A, 354 B, 354 C, 354 D जोडण्यात आले आहेत.
वाचा: OYO रूममध्ये प्रियकरासोबत पोहोचली विवाहित प्रेयसी, चेकआऊटवेळी दोघंही आढळले भयानक अवस्थेत!
भारतीय दंड संहितेच्या कलम 354A नुसार, जर एखादी व्यक्ती महिलेला अयोग्य पद्धतीने स्पर्श करते, तिला शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी करते, तिच्या इच्छेविरुद्ध तिला अश्लील साहित्य/पुस्तकं दाखवते; किंवा त्या महिलेवर अश्लील टिप्पणी करत असेल तर, तो व्यक्ती लैंगिक छळासाठी दोषी असेल. दोषी व्यक्तीला कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीसह शिक्षा होऊ शकते.
1. लैंगिक छळ (कलम 1, 2, 3)
- शिक्षा- तीन वर्षे कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही.
- हा जामीनपात्र, दखलपात्र गुन्हा आहे आणि कोणत्याही दंडाधिकार्याद्वारे न्यायपात्र आहे.
- या गुन्ह्यानंतर कोणतीही तडजोड करणं योग्य ठरणार नाही.
2. लैंगिक छळ (कलम 4)
ADVERTISEMENT