Ratan Tata Property : रतन टाटांची 10 हजार कोटींची संपत्ती कोणाला मिळाली? नाव वाचून थक्कच व्हाल

मुंबई तक

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 06:53 PM)

Shantanu Naidu Shares In Ratan Tata Will : रतन टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात कोणा कोणाला वारस ठेवलं आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच आता टाटांच्या संपत्तीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

Ratan Tata And Shantanu Naidu Bond

Ratan Tata Property

follow google news

बातम्या हायलाइट

point

रतना टाटांच्या मृत्यूपत्रात कोण कोणत्या वारसांचा समावेश?

point

शंतनु नायडूंच्या नावावर किती कोटींची संपत्ती?

point

पेटडॉग 'टीटो'साठीही अनलिमिटेड केयर

Shantanu Naidu Shares In Ratan Tatas Will : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरळ आणि साधं आयुष्य जगून उदार व्यक्तीमत्व ठेऊन टाटांनी तमाम नागरिकांची मनं जिंकली होती. रतन टाटा यांचं निधन 9 ऑक्टोबरला झालं. त्यानंतर संपूर्ण जगभरातून टाटांना आदरांजली वाहण्यात आली. टाटांना मानवंदना देतानाच त्यांच्या संपत्तीबाबतही चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामुळे टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात कोणा कोणाला वारस ठेवलं आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच आता टाटांच्या संपत्तीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

टाटांच्या नावावर 10 हजार कोटींची संपत्ती असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली होती. टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात मित्र, टाटा ट्रस्टचे सर्वात तरुण व्यवस्थापक शंतनु नायडू, भाऊ जिम्मी टाटा, सावत्र बहीण शिरीन, डिएना जीजीभॉय, हाऊस स्टाफ आणि अन्य लोकांची भागिदारी नोंदवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी 'टीटो' नावाच्या पाळीव श्वानालाही त्यांच्या संपत्तीत वाटेकरी ठेवलं आहे.

हे ही वाचा >>  Ind vs Nz: मिचेल सँटनरच्या फिरकीनं टीम इंडियाला गुंडाळलं! न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच जिंकली 'Test Series'

टाटांनी त्यांच्या मृत्यूपत्रात स्टार्टअप गुडफॅलोमध्ये त्यांच्या संपत्तीचा काही हिस्सा शंतनु नायडू यांच्या नावावर केला आहे. तसच परदेशात त्यांच्या शिक्षणावर झालेला खर्चही यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. शंतनु नायडू यांच्या नावावर टाटांचा अलिबाग येथील 2 हजार स्केअर फूटचा बंगला, 350 कोटींपेक्षा जास्त फिक्स डिपॉझिट, मुंबईच्या जुहू तारारोड असलेलं दोन मजल्यांचं घर, टाटा सन्समध्ये 0.83 टक्के शेअर्स यामध्ये 165 बिलियन डॉलर्स (जवळपास 13.94 लाख कोटी रुपये) समावेश आहे. आरटीईफ फाऊंडेशनच्या नावावर हे ट्रान्सफर केले जाणार आहेत. 

पेटडॉग 'टीटो'साठी अनलिमिटेड केयर

टाटांनी त्यांचं पाळीव श्वान टीटोची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली होती. या श्वनासाठी टाटांनी अनलिमिटेड केअर असा शब्दप्रयोग केला आहे. जवळपास पाच वर्षांआधी टाटांनी टीटोला दत्तक घेतलं होतं. 

हे ही वाचा >> BJP 2nd Candidates List: भाजपची दुसरी यादी आली समोर, अनेकांना मोठा धक्का

शंतनुने 2014 मध्ये टाटा ग्रुपमध्ये केला प्रवेश

2014 मध्ये अमरिकेत मास्टर डिग्री घेतल्यानंतर शंतनुने टाटा ग्रुप जॉईन केलं होतं. कार्यालयाच्या कामासोबतच ते सामाजिक कार्यतही सहभागी होत होते. त्यांच्या या कामकाजामुळे टाटा सन्सचे चेअरमन रनत टाटा खूपच प्रभावित झाले होते. नायडू यांनी टाटांच्या सहकार्याने गुडफेलो स्टार्टअप सुरु केलं होतं. रतन टाटांच्या संपत्तीत कुलाबा येथील हालेकाई हाऊस, जुहू येथील बंगला, अलिबाग येथील 2 हजार स्क्वेअर फुटांचा बंगला, लक्झरी 20-30 कारचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

    follow whatsapp