Mazi ladki Bahin Yojana Update: राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते चौथ्या हफ्त्यापर्यंतची रक्कमही महिलांच्या खात्यात डिपॉझीट झाल्याचं सरकारी अधिकारी सांगतात.
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर ज्या महिलांचे अर्ज उशिराने वैध ठरत आहेत त्या महिलांना एकत्रितरित्या रक्कम मिळत आहे. म्हणजे एकूण काही महिलांना थेट 7500 रुपये म्हणजेच पहिल्या हप्त्यापासूनचे पैसे मिळत आहेत.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशींच्या व्यक्ती प्रेमात असतात लकी! तुमचं लव्ह लाईफ कसं राहील?
सरकारने महिलांसाठी ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. सरकारकडून ही रक्कम थेट महिलांच्या खात्यावर जमा केली जाते. पण यासाठी महिलांना काही नियमांचं पालन करावं लागतं. म्हणजेच महिलेचं वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
येत्या काही दिवसात दिवाळीचा सण-उत्सव सुरु होणार आहे. त्यासाठी महिलांनी शॉपिंग करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अशातच महिलांना सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा जो लाभ मिळत आहे. त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. पण योजनेचे हे पैसे अशा महिलांनाच मिळतात, ज्या महिला या योजनेच्या अटी पूर्ण करणार आहेत.
ADVERTISEMENT