Lok Sabha 2024 BJP First List : मोदी वाराणसी, तर शाह...; भाजपची 100 नावं निश्चित

मुंबई तक

01 Mar 2024 (अपडेटेड: 01 Mar 2024, 12:42 PM)

BJP Lok Sabha 2024 Candidates list : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवारी रात्री ११ वाजता सुरू झाली, ती शुक्रवारी पहाटे ३.१५ वाजता संपली.

भाजपकडून कुणाला दिली जाणार उमेदवारी?

BJP's first list of 100 candidates finalized

follow google news

बातम्या हायलाइट

point

उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी पहाटेपर्यंत बैठक

point

भाजपकडून पहिल्या यादीत १०० उमेदवारांची होऊ शकते घोषणा

point

मोदी वाराणसी, तर शाह गांधीनगरमधून लढणार?

BJP Prepared first list of Candidates for Lok Sabha Election 2024 : (पॉलोमी साहा, दिल्ली) 'अब की बार चार सौ पार'चे लक्ष ठेवत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपने 100 उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शुक्रवारी (१ मार्च) पहाटेपर्यंत चालली. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींनीही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी रात्री 11 वाजता मध्यवर्ती कार्यालयात आले आणि पहाटे साडेतीनच्या सुमारास निघून गेले. बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. एक-दोन दिवसांत पहिली यादी येऊ शकते, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. (PM Modi will contest elections from Varanasi, Amit Shah from Gandhinagar)

हे वाचलं का?

PM मोदी वाराणसीतून, तर अमित शाह गांधीनगरमधून लढणार!

या यादीमध्ये पीएम मोदी (वाराणसी), गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर), राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्यासह हायप्रोफाइल उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत आणि 2019 मध्ये भाजपने कमी फरकाने गमावलेल्या किंवा जिंकलेल्या 'कमकुवत' जागा आहेत. त्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

रात्री उशिरा झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ज्या राज्यांबद्दल चर्चा झाली त्यात उत्तर, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आसाम, तेलंगणा, केरळ आणि इतर राज्यांचा समावेश होता. 

हेही वाचा >> Navneet Rana यांना महाराष्ट्र सरकारचा 'सुप्रीम' झटका, निवडणुकीआधी वाढल्या अडचणी?

केंद्रीय मंत्री जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि जे आगामी निवडणुका लढवण्याची शक्यता आहे; त्यात भूपेंद्र यादव, ज्योतिरादित्य सिंधिया, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, सर्बानंद सोनोवाल, व्ही मुरलीधरन यांचा समावेश आहे. अनेक महिला चेहऱ्यांसह नव्या चेहऱ्यांवर भाजपचा भर असणार आहे.

दिल्लीतील तीन खासदारांचा पत्ता होणार कट

याशिवाय बंगालमधील आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना टक्कर देण्यासाठी भोजपुरी स्टार पवन सिंहसह भाजप इतर ठिकाणी काही सेलिब्रिटी चेहरे आणण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतील भाजप खासदारांचे भवितव्यही धोक्यात आले आहे, कारण पक्षाने किमान तीन विद्यमान खासदारांना बदलण्याची तयारी केली आहे.

 

अन्नामलाई तामिळनाडूतून लढवणार निवडणूक 

भाजप पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनाही रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भोपाळमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. सध्या भोपाळमधील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर या अनेकदा वादात सापडल्या आहेत. याशिवाय तेलंगणात भाजपचे विद्यमान खासदार बंदी संजय, जी किशन रेड्डी आणि अरविंद धर्मपुरी यांना पुन्हा रिंगणात उतरवले जाणार आहे.

हेही वाचा >> NCP ची बँक खाती अजित पवार गटाच्या ताब्यात, मुंबईत पक्ष कार्यालयावरही दावा

या बैठकीत विविध राज्यांवरही चर्चा झाली. बैठकीत राजस्थानवरही चर्चा झाली आणि यावेळी मुख्यमंत्री भजनलाल, वसुंधरा राजे आणि सतीश पुनिया हे देखील उपस्थित होते. आसाममध्ये असं सत्र ठरलं आहे की, मित्रपक्षांना 3 जागा, यात आसाम गण परिषदेला 2 जागा आणि एपीपीएलला 1 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    follow whatsapp