Maharashtra 48 MP: शिंदे-ठाकरे की, पवार-पवार... तुमचा खासदार सध्या नेमका कोणासोबत?

मुंबई तक

06 Mar 2024 (अपडेटेड: 06 Mar 2024, 06:02 PM)

Maharashtra 48 MP list: महाराष्ट्रात जे 48 खासदार आहेत ते सध्या नेमके कोणासोबत आहेत याची यादीच आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. पाहा तुमचा खासदार नेमका कोणासोबत आहे.

महाराष्ट्रातील कोणता खासदार कोणासोबत?

महाराष्ट्रातील कोणता खासदार कोणासोबत?

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील 48 खासदारांची यादी

point

कोणता खासदार कोणत्या पक्षात?

point

कोणत्या गटाकडे किती खासदार

Maharashtra 48 MP 2019 list: मुंबई: लोकसभा 2024 च्या (Lok Sabha Election 2024) निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते.  त्यामुळे आता सर्वच इच्छुक कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. यंदा या लोकसभा जागांवर कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, त्याआधी महाराष्ट्रातील नेमकं राजकीय गणित काय आहे हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. (complete list of 48 mp in maharashtra know which mp with which party)

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पक्षांमध्ये जी फूट पडली आहे त्यामुळे येथील राजकारण हे खूपच रंजक झालं आहे. यामुळे 2019 साली जे खासदार निवडून आले होते ते आता कोणत्या पक्षात किंवा कोणाच्या गटात आहे हे आपण आधी जाणून घेऊया.

हे ही वाचा>> ठाकरेंशी वैर घेऊन भाजपसोबत गेलेले शिंदे तहात फसले!

2019 साली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून विजयी झालेला खासदार आता कोणासोबत?

  1. मुंबई-उत्तर - गोपाळ शेट्टी (भाजप)
  2. मुंबई-उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर (शिवसेना- शिंदे गट)
  3. मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)    - मनोज कोटक    (भाजप)
  4. मुंबई उत्तर मध्य    - पूनम महाजन    (भाजप)
  5. मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना - शिंदे गट)
  6. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना - ठाकरे गट)
  7. भिवंडी - कपिल पाटील    (भाजप)
  8. कल्याण - श्रीकांत शिंदे    (शिवसेना - शिंदे गट)
  9. ठाणे - राजन विचारे (शिवसेना - ठाकरे गट)
  10. रायगड    - सुनिल तटकरे     (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गट)
  11. मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना - शिंदे गट)
  12. पुणे - गिरीश बापट (भाजप, गिरीश बापटांच्या निधनामुळे जागा रिक्त)
  13. बारामती - सुप्रिया सुळे    (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट)
  14. शिरूर- अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट)
  15. अहमदनगर - सुजय विखे (भाजप)
  16. हिंगोली - हेमंत पाटील (शिवसेना - शिंदे गट)
  17. नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) 
  18. परभणी - संजय जाधव (शिवसेना - ठाकरे गट)
  19. जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
  20. औरंगाबाद - इम्तियाज जलिल (MIM)     
  21. दिंडोरी- डॉ. भारती पवार (भाजप)
  22. माढा - रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)
  23. सांगली - संजयकाका पाटील (भाजप) 
  24. सातारा - श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट)
  25. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत (शिवसेना - ठाकरे गट)
  26. कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना - शिंदे गट)
  27. हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना - शिंदे गट)
  28. नाशिक    - हेमंत गोडसे (शिवसेना - शिंदे गट)
  29. पालघर - राजेंद्र गावित (शिवसेना - शिंदे गट)
  30. शिर्डी - सदाशिव लोखंडे     (शिवसेना - शिंदे गट)
  31. बीड - डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
  32. नंदुरबार - हिना गावित (भाजप) 
  33. धुळे - सुभाष भामरे (भाजप) 
  34. जळगाव - उन्मेष पाटील (भाजप)
  35. रावेर - रक्षा खडसे - (भाजप)
  36. बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना - शिंदे गट)
  37. अकोला    - संजय धोत्रे (भाजप)
  38. अमरावती - नवनीत कौर राणा (अपक्ष)     
  39. वर्धा - रामदास तडस (भाजप)
  40. रामटेक - कृपाल तुमाने    (शिवसेना - शिंदे गट)
  41. नागपूर- नितीन गडकरी    (भाजप)
  42. भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप)
  43. गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप)
  44. चंद्रपूर - बाळू धानोरकर (काँग्रेस, खासदार बाळू धानोरकरांच्या निधनामुळे जागा रिक्त)
  45. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (शिवसेना - शिंदे गट)
  46. उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना - ठाकरे गट)
  47. लातूर - सुधाकर श्रृंगारे (भाजप)
  48. सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)

हे ही वाचा>> ठाकरेंची सेना 'या' 8 जागा जिंकणार, तर शिंदेंची सेना 6 जागांवर! ओपिनियन पोल काय?

निवडणुकांमध्ये जागा वाटप हा अत्यंत कळीचा मुद्दा असतो. त्यामुळेच अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडी यांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाही. त्यामुळेच आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे आपआपल्या मतदारसंघात नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लागून राहिलं आहे.

    follow whatsapp