Nitin Gadkari : गडकरींऐवजी दुसरा उमेदवार? निरीक्षकांच्या प्रश्नाने चर्चांना उधाण

मुंबई तक

03 Mar 2024 (अपडेटेड: 03 Mar 2024, 01:07 PM)

Nitin gadkari lok sabha news : नितीन गडकरी उमेदवार हवेत की, दुसरा हवा, अशी विचारणा पक्षाच्या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली.

नागपूरमध्ये भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी.

BJP's may change candidate in nagpur lok sabha

follow google news

बातम्या हायलाइट

point

नितीन गडकरींच्या मतदारसंघात भाजपचे निरीक्षक

point

भाजपकडून नागपूर मतदारसंघाचा आढावा

point

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काय केली मागणी?

Nitin Gadkari Lok Sabha : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत तब्बल १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पण, यात नितीन गडकरी यांचं नाव नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यातच भाजपच्या लोकसभा निरीक्षकांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी हवेत की दुसरा उमेदवार हवा? अशी विचारणा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली. त्यामुळे भाजपचा वेगळा सुरू आहे का? अशी चर्चा सुरू झालीये. (BJP asked office bearers whether they want Nitin Gadkari as their candidate or anyone else.)

हे वाचलं का?

भाजपच्या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्याबरोबर नितीन गडकरींचं नाव असेल, असे म्हटले जात होते. पण, तसे घडलेले नाही. इतर नेत्यांची नावे आहेत, मात्र गडकरींच्या नावाचा समावेश नाही. 

ज्या राज्यातील उमेदवार भाजपने जाहीर केले, त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची चर्चा केली जात असताना एक वेगळी माहिती समोर आली आहे. 

गडकरी हवेत की दुसरा उमेदवार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय लोकसभा निरीक्षक नियुक्त केले आहेत. खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार अमर साबळे यांच्याकडे नितीन गडकरींच्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. ते मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहे. सोबतच उमेदवारांविषयी मत जाणून घेत आहेत. 

हेही वाचा >>  पहिल्या यादीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचं वाढवलं टेन्शन, कारण...

गुरुवारी (29 फेब्रुवारी) निरीक्षक खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार अमर साबळे नागपूरमध्ये होते. त्यांनी मतदारसंघातील पक्षाच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. 

भाजपची निवडणुकीची तयारी, उमेदवाराविषयी मत, विजयाच्या शक्यतेसह इतर माहिती जाणून घेतली. यावेळी निरीक्षकांनी 'नितीन गडकरी उमेदवार हवे की दुसरे', अशी विचारणा केली. 

हेही वाचा >> Devendra Fadnavis यांना जीवे मारण्याची धमकी, साताऱ्यातून नवलेला अटक

हा प्रश्न अनेकांना रुचला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून गडकरी यांची कामगिरी संपूर्ण देशाला ठावूक आहे. त्यांचा संपर्क, जनाधार, समाजकार्य, विकासकामे याविषयी विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळे हा प्रश्चच नागपूरमध्ये उपस्थित होत नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

भाजपने केंद्रीय मंत्र्यांची कापली तिकीटं

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना भाजपने पक्षाच्या अनेकांना धक्का दिला आहे. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय राज्यमंत्री जॉन बारला यांची तिकीटं कापली आहे. काही खासदारांचाही पत्ता कट केला आहे. त्यामुळे गडकरींच्या बाबतीत भाजपच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. 

    follow whatsapp