विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता आठवडाभराहून अधिक काळ उलटून गेलाय. मात्र महायुतीमधील पक्ष मुख्यमंत्री ठरवू शकले नाहीत, सरकार स्थापन करु शकले नाहीत. हा फक्त महाराष्ट्राचाच अपमान नाही, तर त्यांच्या प्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या मदतीचाही अपमान आहे असं म्हणत आदित्य ठातरेंनी महायुतीवर निशाणा साधला आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर भली मोठी पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी या विषयावरुन महायुतीवर आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >Eknath Shinde : शिंदेंचं हेलिकॉप्टर साताऱ्यातून उडणार, कुठे उतरणार? दौऱ्याबद्दल मोठी अपडेट, घडामोडींना वेग
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, नियम फक्त विरोधी पक्षांना लागू होतात, तर काही विशेष लोकांसाठी नियम लागू होत नाहीत. सरकार स्थापनेचा दावा न करता आणि माननीय राज्यपालांना संख्याबळ न दाखवता थेट शपथविधीची तारीख जाहीर करणे म्हणजे शुद्ध अराजकता आहे. तर हे सर्व सुरू असताना दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री अमावस्येच्या मुहुर्तावर नेमहीप्रमाणे गावी गेले आहेत असं म्हणत शिंदेंना टोलाही लगावला. तसंच जे सरकार स्थापन करू शकतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र प्राधान्य नाही, तर ते दिल्ली ट्रीपचा आनंद घेत आहेत.
राष्ट्रपती राजवट? ती आत्तापर्यंत लागू व्हायला हवी होती ना? विरोधकांकडे संख्याबळ असतं आणि ते निर्णय घेऊ शकले नसते, तर राष्ट्रपती राजवट लागू झाली नसती का? असा खोचक सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. एवढ्यावर न थांबता आदित्य ठाकरे पुढे असंही म्हणाले की, असं असलं तरी, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानुसार ज्यांना शपथ दिली जाईल त्यांचं आमच्याकडून अभिनंदन.
संजय राऊतांची शिंदेंवर टीका
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी डी. वाय. चंद्रचूड, सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक जबाबदार आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच शिंदेंबद्दल प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की शिंदेंची प्रकृती नाजूक आहे. त्यांना डॉक्टरांची गरज की मांत्रिकाची गरज आहे असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच राज्याच्या शपथविधीसाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने यावं लागू शकतं असंही राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा >> New Rules from 1 December 2024 : क्रेडिट कार्ड ते बँकांच्या सुट्टया... डिसेंबरमध्ये कोणते नवे बदल होणार?
शिंदेंसमोर कोणती हाडकं टाकायची आणि कोणती चघळायची हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह ठरवणार आहेत. यांच्या हातात फक्त रुसवे-फुगवे आणि शरणागती एढंच आहे. याच स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला होता असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT