Maharashtra CM पदाच्या रेसमध्ये 'या' नेत्याचं नाव सर्वात पुढे! माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, "भाजपचे पक्षश्रेष्ठी..."

मुंबई तक

• 03:21 PM • 01 Dec 2024

Raosaheb Danve On Maharashtra CM Face: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानात सायंकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Raosaheb Danve On Maharashtra CM Face

Raosaheb Danve On Maharashtra CM Face

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री?

point

भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी प्रतिक्रिया

point

5 डिसेंबरला होणार शपथविधी सोहळा

Raosaheb Danve On Maharashtra CM Face: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानात सायंकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव अधिकृतपणे जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.

हे वाचलं का?

रावसाहेब दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून अंतिम मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहोत. पुढचा मुख्यमंत्री कोण आहे, हे महाराष्ट्राच्या लोकांना महिती आहे. तसच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबईत आझाद मैदानात 5 डिसेंबरला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. परंतु, मुख्यमंत्री कोण असेल, याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाहीय. 

हे ही वाचा >>  Eknath Shinde : शिंदेंचं हेलिकॉप्टर साताऱ्यातून उडणार, कुठे उतरणार? दौऱ्याबद्दल मोठी अपडेट, घडामोडींना वेग

CM पदाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस सर्वात पुढे

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दोनवेळा राज्याचा कारभार सांभाळला आहे. शिंदेंच्या नेतृत्त्वातील मागील सरकारमध्ये फडणवीसांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री 29 नोव्हेंबरला सातारा जिल्ह्यातील दरेगावात गेले होते. त्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली होती. शिंदे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्याबाबत खुश नसल्याची अटकळ बांधली जात आहे. 

हे ही वाचा >> Sanjay Raut Vs Eknath Shinde : "यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि कोणती चघळायची हे मोदी-शाह ठरवणार"

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना दानवे म्हणाले, राज्य मंत्रिमंडळात कुणाला सामील करायचं आहे, ते मुख्यमंत्र्यांचे विशेषाधिकार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्याने राज्याच्या प्रशासकीय कामात कोणताही अडथळा निर्माण झाला नाहीय. जेव्हा मनमोहन सिंग (मागील यूपीए  सरकारच्या वेळी) देशाचे पंतप्रधान होते. तेव्हा त्यांची हार्ट सर्जरी झाली होती आणि प्रशासकीय काम सुरु होतं. 

    follow whatsapp