Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट, म्हणाले,  "त्यावेळी EVM बद्दल कोणी..."

मुंबई तक

• 04:01 PM • 30 Nov 2024

Ajit Pawar On EVM : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने या निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव दोन दिवसांपासून पुण्यात उपोषणाला बसले आहेत.

Ajit Pawar Meets Baba Adhav

Ajit Pawar Meets Baba Adhav

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट

point

अजित पवारांनी नाना पटोलेंना सुनावलं

point

पवार ईव्हीएमबाबत नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar On EVM : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने या निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव दोन दिवसांपासून पुण्यात उपोषणाला बसले आहेत. यावेळी अजित पवारांनी बाबा आढावांची भेट घेत विरोधकांचा समाचार घेतला. पवार म्हणाले, "मागील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या. आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं, तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्यामध्ये ईव्हीएमबद्दल कुणी बोललं नाही. आम्हीही बोललो नाही". 

हे वाचलं का?

अजित पवार पुढे म्हणाले, "माझं बारामतीतलं उदाहरण सांगतो. बारामतीत मी जो उमेदवार उभा केला होता, तो 48 हजार मतांनी पराभूत झाला. त्यानंतर लगेचच पाच महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीत मीच त्या 48 हजाराची भर काढून 1 लाखांच्या वर मतांनी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती, लोकसभेला ताईला आणि विधानसभेला दादाला. आता जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार. मला आठवतंय 1999 ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला विलासराव देशमुखांना केलं. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. 

हे ही वाचा >> Sharad Pawar : "एवढं स्पष्ट बहुमत मिळूनही जर..." पुण्यात शरद पवारांचं मोठं विधान

अजित पवार नाना पटोलेंवर टीका करत म्हणाले,"नाना पटोले परवा म्हणाले, संध्याकाळी मतदान वाढलं. अहो नाना पटोले साहेब..साडेचार-पाचच्या पुढे लोकं रांगेत आले. ते आतमध्ये घेतले. माझ्या इथे सकाळी सात ते नऊ पाच टक्केच मतदान झालं होतं. यात आमचा काय दोष आहे. मतदानाला जाण्यासाठी मी पण मतदारांना विनंती करत होतो. पण मतदार राज्यावर आम्ही जबरदस्ती करू शकत नव्हतो. पैशांचा धुमाकूळ झाला असं म्हणतात. पण त्यांसदर्भात व्हिडीओ आहेत. जर कुठं झालं तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे. इतर राज्यात बुथ कॅप्चरिंग चालतं, तसं मला महाराष्ट्रात पाहायला मिळालं नाहीय. महाराष्ट्रात जनतेनं कौल दिला."

हे ही वाचा >> 30th November Gold Rate: सोनं घ्या सोनं! 24 तासातच सोन्याच्या भावात मोठी घसरण, मुंबईत आजचे भाव काय?

    follow whatsapp