Eknath Shinde Satara : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील दरे गावात गेले आहेत. राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यादरम्यान त्यांचं असं अचानक गावाला निघून जाणं हे मोठ्या चर्चांचं कारण ठरलं. त्यातच आता त्यांच्या दौऱ्याबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. ते आज साताऱ्यातील आपल्या गावातून निघणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. राज्यात 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले, त्यानंतर सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं. मात्र 26 तारखेला विधानसभेची मुदत संपूनही नवा मुख्यमंत्री कोण हे समोर आलेलं नाही. त्यातच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनाही जोर आलाय.
ADVERTISEMENT
दिल्लीत एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर आणि मंत्रिपदांच्या वाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र त्याबैठकीनंतर तिन्ही नेते मुंबईत आले आणि एकनाथ शिंदे हे थेट साताऱ्यातील दरे गावी रवाना झाले आहेत. यादरम्यान ते आजारी असल्याचंही समोर आलं होतं. आज संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करताना ते आजारी असून, त्यांनी आपल्या मंत्र्यांनाही भेट दिली नाही असं म्हटलंय. त्यानंतर आता शिंदेंच्या दौऱ्याबद्दल अपडेट समोर आली आहे.
हे ही वाचा >>Sanjay Raut Vs Eknath Shinde : "यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि कोणती चघळायची हे मोदी-शाह ठरवणार"
एकनाथ शिंदे दुपारी ठाण्यात पोहोचणार?
सातारा जिल्ह्यातील दरे गावात असलेले एकनाथ शिंदे आज ठाण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरे गावातील हेलिपॅडवरुन निघून एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजेपर्यंत महाबळेश्वर येथील हेलिपॅडवर पोहोचतील, तर त्यानंतर ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठाण्यात पोहोचतील अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे ठाण्यात आल्यावर काय बोलणार आणि काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हे ही वाचा >> Raj Kundra Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचं समन्स, 15 ठिकाणी छापेमारीनंतर...
दुसरीकडे राज्यात येत्या 5 तारखेला महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या चार दिवसांत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकनाथ शिंदे यांना कोणती जबाबदारी मिळणार, भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला संधी मिळणार यावर सगळ्या देशाचं लक्ष सध्या लागून आहे.
ADVERTISEMENT