Sanjay Raut Vs Eknath Shinde : "यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि कोणती चघळायची हे मोदी-शाह ठरवणार"

मुंबई तक

01 Dec 2024 (अपडेटेड: 01 Dec 2024, 11:51 AM)

चंद्रशेखर बावनकुळे सांगत आहेत की, पाच डिसेंबरला शपथ घेऊ, ते काय काय राज्यपाल आहेत का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे गावी रवाना

point

संजय राऊत यांची सडकून टीका

निकाल लागून 10 दिवस उलटून गेले, मात्र अजून कुणीही सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. बहुमत आहे तरी अशी अवस्था आहे, तरी राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. चंद्रशेखर बावनकुळे सांगत आहेत की, पाच डिसेंबरला शपथ घेऊ, ते काय काय राज्यपाल आहेत का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Raj Kundra Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचं समन्स, 15 ठिकाणी छापेमारीनंतर...

 

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी डी. वाय. चंद्रचूड, सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक जबाबदार आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच शिंदेंबद्दल प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की शिंदेंची प्रकृती नाजूक आहे. त्यांना डॉक्टरांची गरज की मांत्रिकाची गरज आहे असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच राज्याच्या शपथविधीसाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने यावं लागू शकतं असंही राऊत म्हणाले आहेत. 

हे ही वाचा >> New Rules from 1 December 2024 : क्रेडिट कार्ड ते बँकांच्या सुट्टया... डिसेंबरमध्ये कोणते नवे बदल होणार?

 

शिंदेंसमोर कोणती हाडकं टाकायची आणि कोणती चघळायची हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह ठरवणार आहेत. यांच्या हातात फक्त रुसवे-फुगवे आणि शरणागती एढंच आहे. याच स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला होता असं राऊत म्हणाले. 

एकनाथ शिंदेंना हवं गृहमंत्री पद?

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर देखील आठवडा उलटला तरीही नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यामुळे विरोधकांनी महायुतीवर टीका करणं सुरू केलं आहे. 

मात्र, या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची नाराजी हे मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते. पण निकालाच्या चार दिवसानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भाजप ठरवेल त्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देऊ असं जाहीर केलं. 

 

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शाह यांच्या घरी महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक पार पडली. ज्यामध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब झालं. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज झाल्याची चर्चा रंगली.



    follow whatsapp