Amol Mitkari on Akola Akot NCP मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपल्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यानंतरही आता काही जागांवरुन महायुतीत नाराजी पाहालया मिळते आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे अकोटमधून आमदारकीसाठी इच्छूक आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबद्दल आणखी साशंकता आहे. अकोट, बाळापूर आणि अकोला पश्चिम या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उमेदवारी मिळावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. (Amol Mitkari is interested from akola vidhan sabha constituency)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Shivadi Vidhan Sabha : शिवडीच्या जागेचा मुद्दा शिगेला? अजय चौधरी की सुधीर साळवी? 'या' नेत्याचं पारडं जड
अकोट हे माझं जन्मस्थळ असून, या मतदारसंघात 20 वर्षांपासून काम करतोय, त्यामुळे या मतदारसंघातून मला स्वत:ला उमेदवारीची अपेक्षा आहे असं म्हणत अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा विधानसभेवर दावा केला आहे. तसंच अकोट, बाळापूर आणि अकोला पश्चिम हे तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवासाठी सुटावेत, राष्ट्रवादी पक्षाचं काही अस्तित्व आहे की नाही असं म्हणत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसंच आपल्या उमेदवारीसाठी लोकांनी नवस केलेत, लोक आग्रही आहेत, मी पाण्यासह अनेक प्रश्न सोडवलेत असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. एकूणच अकोला जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांवर अमोल मिटकरी यांनी दावा केला आहे. आतापर्यंत 38 लोकांची यादी आली आणि 30 लोकांची यादी येणार असं मिटकरी म्हणाले आहेत.
हे ही वाचा >>Eknath Shinde: 33 आमदार, 9 नवखे आणि 3 अपक्ष... CM शिंदेंनी एका दगडात किती पक्षी मारले?
दिवाळी न करता तुम्हाला पैसे देऊ, मतंही देऊ असं म्हणत लोकांनी मला पाठिंबा दिला आहे, इथल्या भाजप आमदारांबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहे, भाजपच्या सर्व्हेतही ते दिसून आलं, त्यामुळे दुसऱ्या यादीत आपलं नाव नक्की असेल असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला आहे. अकोट बारामतीसारखा व्हावा असं मला वाटतं, बारामती तर फक्त नगर परिषद आहे, अकोट तर तालुका आहे...पण अजित पवार यांच्या सहकार्याशिवाय ते अशक्य आहे असंही अमोट मिटकरी म्हटलं आहेत. त्यामुळे आता महायुती काय निर्णय घेणार तसंच अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT