Chhagan Bhujbal : ईडीपासून मुक्तिसाठी भाजपसोबत... भुजबळ काय म्हणाले? राजकीय वर्तुळात खळबळ का माजली?

मुंबई तक

08 Nov 2024 (अपडेटेड: 08 Nov 2024, 12:20 PM)

ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा समोर आल्यानं आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ यांच्याबद्दलच्या मुद्द्यावरुन चर्चा का सुरू झाली?

point

भुजबळांनी यांनी नेमका काय दावा केला?

point

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकात काय म्हटलंय?

Chhagan Bhujbal : ईडीने दबाव टाकून मला पक्ष बदलण्यास भाग पाडलं.. मी ओबीसी असल्यामुळे मला लक्ष्य करण्यात आलं असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या आगामी पुस्तकात हा विषय मांडण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा समोर आल्यानं आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या कुणासोबतच... शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठं वक्तव्य

 

"अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत महायिती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका... ती झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला... माझ्यासाठी ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जमन्मच होता..." असं राजदीप सरदेसाई यांनी आपल्या आगामी पुस्तकात लिहिल्याचं समोर आलं आहे. एका वृत्तपत्रात ही बातमी छापून आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 

छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, ज्या वृत्तपत्रात ही बातमी छापून आली, त्यांना मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मला महाराष्ट्र सदन प्रकरणातून मला क्लीन चीट मिळाली असून, त्यानंतर मी शरद पवार यांना पेढेही दिले असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसंच या बातमीत केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत. तसंच आम्ही विकासासाठी आलो हेच सांगत आलो आहोत. ज्या 54 लोकांनी वेगळा निर्णय घेण्यासाठी सह्या केल्या, त्या सर्व लोकांवर ईडीच्या केसेस नाहीत असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपली बाजू स्पष्ट केली. तसंच ज्या पुस्तकात हे लिहीलं गेलं आहे, ते मी वाचलं नाही, ते वाचून मी पुढचा निर्णय घेईल असं भुजबळ म्हणाले. 

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सांगितलं की, आपण वस्तुस्थिती समोर ठेवली आहे, त्याबद्दल अधिक छगन भुजबळ सांगितील. याबद्दल छगन भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझी केस ही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असतानाच सुटलेली आहे. मात्र यावर आमचं लक्ष आहे, निवडणुकीनंतर आम्ही निर्णय घेऊ. 

 

 

    follow whatsapp