Uddhav Thackeray targets Ek Nath Shinde : अकोल्यात नितीन देशमुख यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेला घटनाक्रम सांगितलं. भाजपने पाठीत वार केल्यामुळे खोटेपणा सहन न झाल्यामुळे मी बाहेर पडलो, गळ्यात पट्टा घालून भाजप घेऊन गेलं असतं, पण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे असं म्हणत भाजपला इशारा दिला आहे. तसंच मी गद्दारांना मोठं केलं, माझी चूक झाली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागितली..
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"मी चुकीच्या माणसाला मोठं केलं, त्याबद्दल मी महाराष्ट्राची माफी मागतो" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अकोल्यात उपस्थितांना संबोधित केलं. "तुम्ही मान, सन्मान, प्रेम दिलं, त्याबद्दल अभिमान आहे. ज्यावेळी गद्दार पळून जात होते, तेव्हा मी यांच्या मुसक्या बांधून कुठेही टाकू शकलो असतो. मी मुख्यमंत्री होतो... पण ही सडलेली माणसं मला नको होती, म्हणून म्हटलं जाऊद्या, गेट आऊट... अडीच वर्षाच्या काळात सर्व मंत्रीपद त्यांना दिली, मी एकमेव मुख्यमंत्री असेल, ज्यांनी सगळी खाती इतरांना दिली होती, माझ्याकडे एकच खातं होतं, मी सगळं या दाढीवाल्यांना दिलं होतं, गद्दारांना दिलं होतं, जेवढं ओरबाडायचं होतं, तेवढं ओरबाडलं, असं म्हणतात की, चोरी पकडली गेली आणि हे शेपुट घालून पळून गेले" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा >>Manoj Jarange Vs Raj Thackeray : माझ्या नादी लागू नका, मी तुमच्यासारखा... मनोज जरांगे थेट बोलले, राज ठाकरे यांना इशारा दिला
पुढचा घटनाक्रम सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मला लक्षात आलं होतं की, हे माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणणार, तेव्हा बसले होते ते कोश्यारी, त्यांचेच हस्तक होते, त्यांनी लगेच अधिवेशन बोलावलं. सुप्रीम कोर्टाने त्यांना त्यासाठी कानफटात मारली. पण तेव्हा मी म्हटलं होतं, की माझा एकही माणूस माझ्या विरोधात जात असेल तर मला मुख्यमंत्रीपदी राहायचं नाहीये, मी वर्षा बंगला तात्काळ सोडला, अनेकांचं आयुष्यभर स्वप्न राहतं मुख्यमंत्री व्हायचं, मात्र मला तुमच्या आशीर्वादाने वर्षा बंगला मिळाला. मी वर्षावरुन मातोश्रीकडे जात होतो, तेव्हा हे सगळी गर्दी होती, लोक रडत होते, तेव्हा गद्दारांच्या हातात ग्लास होते" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर हल्ला केला.
Uddhav Thackeray यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधताना गंभीर आरोप केले आहेत. "भाजपने पाठीवर वार केला, मुख्यमंत्रीपदाचं जे ठरलं होतं ते द्यायला नकार दिला, तो खोटेपणा सहन न झाल्यामुळे मी बाहेर पडलो. नाहीतर यांनी आपल्याला फरफटत नेलं असतं, गळ्यात पट्टा घालून, पण मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, माझ्या गळ्यात तुम्ही पट्टा घालू शकत नाही" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यांनी मोदी आणि शाहांवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT