Devendra Fadnavis On Sharad Pawar: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 जागाही जिंकता न आल्यानं विरोधकांनी इव्हीएमला जोरदार विरोध दर्शवला आहे. अशातच शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मतदानाची आकडेवारी जाहीर करून भाजपने इतक्या जागा कशा जिंकल्या याचा हिशोबच मांडला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी पवारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मतदानाची आकडेवारीच जाहीर केलीय.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
"श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे"
हे ही वाचा >> Bhaskar Jadhav : विरोधी पक्षाच्या आमदारांकडून शपथविधीवर बहिष्कार! भास्कर जाधवांनी सांगितलं खरं कारण
काय म्हणाले होते शरद पवार?
"निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळी यश मिळतं. तेव्हा उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात आता तसं वातावरण दिसत नाही. पण उगीचच आरोप करणं योग्य नाही. माझ्याकडे त्यासंबंधीची अधिकृत माहिती नाहीय. आम्ही फक्त काही आकडेवारी गोळा केलीय. साधारणत: प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला या निवडणुकीत एकंदरीत मतं किती पडली आणि त्यांचे लोक किती निवडून आले? काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात 80 लाख मतं आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 'त्या' महिलांना मिळणार नाहीत 2100? CM फडणवीसांनी केली घोषणा
आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना (शिवसेनेला) 79 लाख मतं पडली. म्हणजे काँग्रेस पेक्षा 1 लाख कमी आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57...राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मतं 72 लाख आहेत आणि आमचे दहा उमेदवार निवडून आले. अजित पवार गटाला 58 लाख मतं आहेत आणि त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे मोठे आश्चर्यकारक आहेत".
ADVERTISEMENT