Raj Thackeray MNS Manifesto : राज ठाकरे यांनी "आपण 2014 ला सादर केलेल्या ब्लू प्रिंटबद्दल मला काहीच विचारलं नाही, त्याबद्दल धन्यवाद!" असं म्हणत खंत व्यक्त केली. आम्ही हे करू अशा मथळ्याखाली राज ठाकरे यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भर देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. राज ठाकरे यांनी यावेळी आपण कोणकोणत्या विषयांवर काम करणार आहोत हे सांगितलं. तसंच महाराष्ट्राचं आर्थिक गणित पाहिल्याशिवाय मोफतच्या घोषणा करणं अशक्य आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं. सध्या अस्तित्वात असलेल्या गोष्टी राज्यावर बोझा न येता कायम राहिल्या तर मी त्याला गिफ्ट म्हणेल, पण या गोष्टी कायम नाही ठेवता आल्या तर मी त्याला लाज म्हणेल असं म्हणत राज ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
- मुलभूत गरजा आणि जीवनमान :
पुरेसं अन्न, निवारा, पिण्याचं पाणी, महिला, क्रीडा, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार
- दळवणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, शहरांचं जाळं, पर्यावरण, मलनिस्सारन, जैव विविधता, इंटरनेट
हे ही वाचा >>Maharashtra Elections : मराठवाड्यात यंदाही जरांगे पॅटर्न चालणार? या '10' मुद्द्यांची चर्चा : राजदीपचा रिपोर्ट
-
प्रगतीच्या संधी :
औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन, उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण
- मराठी अस्मिता :
शिक्षण, दैनंदिन वापरात, मराठी आणि समाज, जागतिक व्यासपिठावर, प्रशासनात मराठी, डिजिटल जगात मराठी, गड संवर्धन आणि पारंपारिक खेळ
जाहीरनाम्यात राज ठाकरेंनी काय म्हटलंय?
"निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्षाचा जाहीरनामा येतो. सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा हा ५ वर्षे मिळून देखील न करू शकलेल्या कामांची जंत्री असते, तर विरोधकांचा जाहीरनामा हा सत्तेसाठी वाट्टेल ते अशा प्रकारच्या आश्वासनांनी भरलेला असतो आणि त्यामुळे जनतेसाठी ती रद्दी असते.
मला असा जाहीरनामा कधीच मान्य नव्हता. म्हणूनच आम्ही २०१४ साली महाराष्ट्राच्या पुढच्या ५० वर्षांचा विचार करून, राज्याच्या विकासाचा आराखडा बनवला. यांत महाराष्ट्राच्या विकासाबद्दलच्या मूलभूत आणि सर्वांगीण कल्पना मांडल्या होत्या. पण या विकास आराखड्याची माध्यमांनी दखल घेतली नाही हे जितकं खेदजनक आहे, त्याहून वाईट म्हणजे १० वर्षांपूर्वी आम्ही हा आराखडा सादर केला त्यावेळचे महाराष्ट्रासमोरचे प्रश्न आज देखील तसेच आहेत.
त्यामुळे या निवडणुकीत २०१४ साली मांडलेला विकास आराखडा आम्ही जाहीरनामा म्हणून पुन्हा समोर ठेवत आहोत. हा विकास आराखडा आणि त्यामागची धारणा येत्या काळात राज्याला आकार देईल आणि त्यातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना." असं म्हणत राज ठाकरे यांनी पुढे सविस्तर जाहीरनाम्याचे मुद्दे मांडले आहेत.
ADVERTISEMENT