Maharashtra Assembly Elections : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उरलेल्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत प्रचार करण्याचं आव्हान सध्या सर्वच राजकीय पक्षांसमोर आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सध्या इंडिया टुडेची टीम रिपोर्टींगसाठी राज्यभर फिरत आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडीटर राजदीप सरदेसाई हे सुद्धा या निवडणुकीच्या रिपोर्टींगसाठी महाराष्ट्रात आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या वातावरण काय आहे? सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या कि नाही? लोकांच्या मनातले मुद्दे काय आहेत? हे जाणून घेण्याचा आलंय. विशेषत: विदर्भातील राजकीय वातावरण आणि जनतेच्या मतांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
- राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला मोठा फटका बसला होता. त्यानंतर मात्र महायुतीने सक्रीय होत राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी मोठी ताकद लावली होती. त्यामुळेह ही योजना किती प्रभावी ठरणार हे पाहणं महत्वाचं होतं. त्यामुळेच ही योजना लोकांपर्यंत पोहोचली असल्याचं दिसतंय.
- लाडकी बहीण योजनेचे पैसे सध्या महिलांपर्यंत पोहोचत आहेत. लाखो महिलांना या योजनेचा लाभ होतोय. मात्र दुसरीकडे याच महिला महागाईकडेही बोट दाखवताना दिसत आहेत.
हे ही वाचा >>PM Narendra Modi: "मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या...", शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हे' काय बोलून गेले
-
राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुढच्या काही दिवसातच लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली. ही योजना लागू होताच, मध्य प्रदेश सरकारप्रमाणे हा निर्णय घेतला असं अनेकजणांकडून सांगण्यात आलं. मात्र सध्या ही राज्यात लाडकी बहीण योजनेचा दबदबा मध्यप्रदेशप्रमाणे नाही असं दिसून येतंय.
- राज्यात प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांचा कौल कुणाला हे फार महत्वाचं ठरतं.त्यामुळेच या निवडणुकीत काय होणार हे सुद्धा शेतकरीच ठरवणार आहेत. सध्या दिसत असलेल्या परिस्थितीनुसार राज्यातील 70 मतदारसंघांमध्ये सोयाबीनचा प्रश्न ज्वलंत आहे. यामुळे शेतकरी प्रचंड असंतुष्ट आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो.
- लाडकी बहीण योजना राज्यभरातील महिलांपर्यंत पोहोचलेली दिसते. याचा लाभ राज्यातील महिला घेतायत, पण योजनेचा लाभ महायुतीतल्या कोणत्या नेत्यांना होणार असाही सवाल निर्माण होत होता. तर सध्याच्या स्थितीनुसार एकनाथ शिंदेंना या योजनेचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण लाडकी बहीण म्हटलं की एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं जातं.
- राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींमघ्ये आरक्षणाच्या आंदोलनाचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे मतदान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचे कारण परिणाम होतील ते पाहणं महत्वाचं होतं. विदर्भातील सध्याचं चित्र हे ADMK फॅक्टर चालणार असल्याचं सांगतंय. आदिवासी, दलित, मुस्लिम,कुणबी समाज कुणाच्या मागे उभा राहणार हे पाहावं लागणार आहे.
- राज्यातले दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटले. अनेक नेत्यांनी पक्ष बदलले. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येती तीन मोठे पक्ष एकत्र आलेत. त्यामुळे बंडखोरांची संख्या वाढली. विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातले बंडखोर तुल्यबळ असून, तिथे मोठा परिणाम पाहायला मिळेल.
ADVERTISEMENT