Devendra Fadnavis : सगळ्यांच्या मनातल्या सगळ्याच गोष्टी पूर्ण करता येत नाही... पहिल्याच भाषणात काय म्हणाले फडणवीस?

सुधीर काकडे

04 Dec 2024 (अपडेटेड: 04 Dec 2024, 01:06 PM)

भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीसांची निवड झाल्यानंतर जोरदार टाळ्या वाजवत, जयघोष करत सर्वांकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड

Devendra Fadnavis Speech : भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणामध्ये सर्वांचे आभार मानले. यावेळी फडणवीस म्हणाले की, ज्या अडीच वर्षांमध्ये आपलं सरकार नव्हतं,  तेव्हा आम्हाला, आमच्या आमदारांना त्रास देण्यात आला मात्र एकाही आमदारानं आपली साथ सोडली नाही असं फडणवीसांनी सांगितलं. यावेळी ते असंही म्हणाले की, एका बूथवरच्या कार्यकर्त्याला पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनी थेट तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली.  

हे वाचलं का?


हे ही वाचा >> Devendra Fadnavis : मी पुन्हा आलोय... भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, जनतेने आपल्याला कौल दिलेला आहे. एक दिलाने सर्व मित्रांना सोबत घेऊन जाऊ. "आपल्याला जेव्हा एवढं मोठा मॅन्डेट मिळतं अशा वेळी सगळ्यांच्या मनाच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाहीत. पण आपण एक मोठं ध्येय घेऊन राजकारणात आलेलो आहोत. आपण फक्त पदांसाठी, कुणीतरी आपल्याला मोठं करावं यासाठी राजकारणात आलेलो नाहीत असं फडणवीस म्हणाले. तसंच येणाऱ्या काळात आपल्या मनासारख्या चार गोष्टी होतील, तर चार गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे एक मोठं ध्येय ठेवून आपल्याला एकत्र काम करावं लागेल असं फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, राज्यात गेल्या 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. तेव्हापासूनच मुख्यमंत्रिपदावरुन तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर अनेक दिवस महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत जाऊन बैठकिला उपस्थित राहिले. मात्र, तरीही मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित नव्हतं. तसंच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार की धक्कातंत्र वापरणार असे चंग बांधले जात होते. मात्र आज भाजपच्या गटनेतेपदी फडणवीस यांची निवड झाली आणि ते मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित झालं आहे.


हे ही वाचा >>Sukhbir Singh Badal attack : सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा पाकिस्तानातून आला? कोण आहे नारायणसिंग?

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवताच मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात भाषण करताना निरीक्षक निर्मला सीतारमण यांनी भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाचं मोठं कौतुक केलं. 

 


    follow whatsapp