Thane Crime News : काळ्या रंगाची साडी दिली नाही म्हणून, दुकानदारावर हल्ला, उल्हासनगरमध्ये काय घटना घडली?

मुंबई तक

• 01:18 PM • 23 Dec 2024

ठाण्यातील उल्हासनगरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही दुकानदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

काळी साडी दाखवली नाही म्हणून, दुकानदारांवर हल्ला

point

ठाण्यातील उल्हासनगरमध्ये काय घटना घडली?

उल्हासनगरमध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी एका साडी दुकानदारावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही दुकानदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या हीरा मॅरेज हॉलजवळ असलेल्या दीपक साडीच्या दुकानात ही घटना घडली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maharashtra News Live : फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ काय म्हणाले? दिल्लीला जाणार? काय निर्णय घेणार?

दोन मद्यधुंद तरुण आले आणि त्यांनी काळ्या रंगाची साडी दाखवण्यास सांगितलं. दुकानदाराने या रंगाची साडी उपलब्ध नसल्याचं सांगून वाइन कलरची साडी दाखवली. यानंतर तरुणांनी हातातील साडी फेकून दिली आणि थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर तरुणांनी दुकानदार दीपक बेहरानी आणि गोविंद बेहराणी यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांना प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं. 

हे ही वाचा >> Mohan Bhagwat : "सत्ता हवी होती तेव्हा मंदिरावर बोलले, सत्ता आल्यावर...", मोहन भागवत यांच्या भूमिकेला 2 मोठ्या महंतांचा विरोध

दोन्ही जखमींची प्रकृती खालावल्यानं त्यांना कल्याणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून, त्यात हल्लेखोर साडी फेकून हल्ला करताना दिसत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यापूर्वीही अशा घटनांमध्ये आरोपींचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेनं परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, कोणतही कारण नसताना ही घटना घडल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. आमच्या बाजूच्या दुकानदारासोबतही असाच वाद झाला होता असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

    follow whatsapp