Mumbai Agra Bus Fire : मुंबईहून आग्राकडे निघालेल्या बसला भीषण आग, ड्रायव्हरमुळे प्रवाशांचे...

मुंबई तक

23 Dec 2024 (अपडेटेड: 23 Dec 2024, 05:01 PM)

आग लागल्याचं कळताच प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही प्रवाशांनी बसमधून उतरून तर काहींनी खिडकीतून उड्या मारून जीव वाचवला.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईहून आग्राकडे निघालेल्या बसला भीषण आग

point

प्रवाशांनी फूल भरलेली होती बस

point

ड्रायव्हरच्या समयसूचकतेमुळे वाचले प्रवासी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील बालसमुंद बॅरियरजवळ रविवारी एका बसला अचानक आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मुंबईहून इंदूरला जात असताना मध्य प्रदेशच्या बरवानीमध्ये ही घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर आली आहे. चालत्या बसमध्ये डिस्क ब्रेक लावत असताना अचानक आग लागली. बसच्या मागून धूर निघत असल्याचं पाहून चालकाने बसचा वेग कमी करून रस्त्याच्या कडेला उभी केली. 

हे वाचलं का?


हे ही वाचा >>Thane Crime News : काळ्या रंगाची साडी दिली नाही म्हणून, दुकानदारावर हल्ला, उल्हासनगरमध्ये काय घटना घडली?

आग लागल्याचं कळताच प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही प्रवाशांनी बसमधून उतरून तर काहींनी खिडकीतून उड्या मारून जीव वाचवला. चालक आणि वाहकाने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. तर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आलं आहे.

मुंबईहून इंदूरकडे जाणाऱ्या हंस ट्रॅव्हलच्या बसला अचानक आग लागली. बसच्या मागील भागातून धूर निघायला लागला होता. बसच्या मागील भागातून धूर येत असल्याचं पाहून बस चालकाने सतर्कता दाखवली. यानंतर बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. प्रवाशांसोबत त्यांचं सामानही बाहेर काढण्यात आलं.

हे ही वाचा >>Sanjay Raut House Reiki: संजय राऊत यांच्या घराची रेकी नाही, 'ते' दोघं कोण होते पोलिसांनी सांगितलं...

बसने हळूहळू पेट घेतला आणि काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी गेली. या घटनेची माहिती मिळताच सेंधवा आणि राजपूर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली. सर्वात सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. एकूणच या प्रकरणात ड्रायव्हरच्या समयसूचकतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. 

    follow whatsapp