Mohan Bhagwat : "सत्ता हवी होती तेव्हा मंदिरावर बोलले, सत्ता आल्यावर...", मोहन भागवत यांच्या भूमिकेला 2 मोठ्या महंतांचा विरोध

मुंबई तक

23 Dec 2024 (अपडेटेड: 23 Dec 2024, 09:29 AM)

मोहन भागवत यांच्या मंदिराबद्दलच्या एका भूमिकेला शंकरचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी विरोध केला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मोहन भागवत यांच्या वक्तव्याला विरोध

point

काय म्हणाले होते मोहन भागवत?

Mohan Bhagwat Vs Mahant : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. मंदिरांबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यावर आता देशातील दोन मोठ्या संतांचीही प्रतिक्रिया आली आहे. तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणाले, मोहन भागवत यांच्या विधानाशी मी अजिबात सहमत नाही. मला स्पष्ट करायचंय की, मोहन भागवत हे आमचे अनुशासक नाहीत, तर आम्हीच त्यांचे अनुशासक आहोत.

हे वाचलं का?

उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही मोहन भागवत यांच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. मोहन भागवत राजकीयदृष्ट्या सोयीची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, जेव्हा त्यांना सत्ता हवी होती तेव्हा ते मंदिरांबद्दल बोलत राहिले. आता सत्ता आल्यावर मंदिरं शोधू नका असा सल्ला ते देत आहेत.

हे ही वाचा >> Kalyan Dombivali : कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीचा विनयभंग केल्यानंतर जाब विचारायला गेलेल्या...

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, भूतकाळात परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची यादी तयार करावी आणि वास्तूंचं सर्वेक्षण केलं जावं. यापूर्वी हिंदूंवर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यांची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त झाली आहेत. आता हिंदू समाजाला आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि जतन करायचं असेल तर त्यात गैर काय?

काय म्हणाले मोहन भागवत?

मोहन भागवत यांनी अलीकडेच मंदिर-मशीद वादांच्या मुद्यावर एक वक्तव्य केलं होतं. "राम मंदिराच्या उभारणीनंतर काही लोकांना असं वाटतंय, की ते पुन्हा नवीन ठिकाणी असेच मुद्दे उपस्थित करून ते हिंदूंचे नेते होऊ शकतात. हे मान्य नाही. राम मंदिर बांधलं गेलं कारण हा सर्व हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता."

मोहन भागवत पुढे म्हणाले, दररोज नवीन प्रकरणं उभे केले जातायत. याची परवानगी कशी देता येईल? हे असंच चालू राहू शकत नाही. आपण एकत्र राहू शकतो हे भारताने दाखवून दिलं पाहिजे.

हे ही वाचा >> Pune Dumper Accident : पुण्यातील वाघोलीमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं

मोहन भागवत म्हणाले, बाहेरून आलेल्या काही गटांनी त्यांच्यासोबत कट्टरता आणली आहे आणि त्यांची जुनी राजवट परत यावी अशी त्यांची इच्छा आहे. पण आता देश संविधानानुसार चालतो. या व्यवस्थेत लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात आणि ते प्रतिनिधी सरकार चालवतात. वर्चस्वाचे दिवस आता गेलेत. 

    follow whatsapp