Maratha Reservation and Shinde Government: बीड: मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज (12 ऑक्टोबर) बीडमधील नारायणगड येथे दसऱ्यानिमित्त जाहीर मेळावा घेत राज्यातील शिंदे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत आता एक नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (if the maratha reservation demand is not accepted the government will be overthrown manoj jarange now openly challenges the shinde government)
ADVERTISEMENT
'जर तुम्ही आम्हाला खुन्नस देऊन आमचा अपमान करून, आमच्या डोळ्यात चटणी टाकून तुम्ही तर अवमान केला तर तुमच्याही नाकावर टिच्चून तुम्हाला उलथं केल्याशिवाय तुम्हाला मागे हटणार नाही.' असं म्हणत जरांगेंनी सरकारला आता आव्हान दिलं आहे.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
'आता सावध व्हा.. यांनी तिसरी खुन्नस दिली आपल्याला.. ती खुन्नस म्हणजे तुम्ही कितीही आंदोलनं करा.. तुम्ही किती झुंजा, तुम्ही कितीही कोटीच्या संख्येने एकत्र या.. आम्ही तुमच्या छातीवर बसून तुमच्या नाकावर टिच्चून त्यांचा निर्णय घेतलाय.. तुमचा निर्णय घेत नाही. ही खुन्नस आपल्या समुदायाला दिली. त्यामुळे यांना उखडून फेकावंच लागणार.'
हे ही वाचा>> Manoj Jarange : ''समाजाला न्याय मिळाला नाहीतर उलथापालथ...'', नारायणगडावरून जरांगेंचा महायुती सरकारला इशारा
'क्षत्रिय मराठ्यांना लढायचं शिकवलंय. आपल्यावर जर डोळ्यादेखत अन्याय करणार असले तर समोरच्याला उखडून फेकावंच लागणार.'
'इथे नाईलाज आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. शेतकऱ्यांचं अनुदान, पीक विमा नाही. मराठ्यांचं आरक्षण नाही. धनगरांचं आरक्षण नाही. गोर-गरीब ओबीसीला खाऊ दिलं जात नाही. इथं मुस्लिम आणि दलितांना दिलं जात नाही. आपणच फक्त एक समुदाय असा आहे सगळ्या जाती-धर्मासाठी झुंजणारा समाज म्हणजे हे जमलेलं विराट रुप.'
'उद्या जर काही गोष्टी करायच्या ठरल्या.. ऐ.. पाऊस यायला लागलाय.. काही जण कशासाठी भिजतात आपण जातीसाठी, लेकरासाठी भिजू.. काय होतं त्याला.. हे शुभ संकेत म्हणतात.. आता तर गाडलेच म्हणून समजायचं..'
'एक गोष्ट लक्षात असू द्या. शेवटी आपल्या पुढे पर्याय नाही. मुख्य भूमिका आचारसंहिता लागल्यानंतर सांगणार आहे. मान्य आहे का तुम्हाला? यांनी आपल्याला फसवलंय. तर आपल्यापुढे एकच पर्याय आहे. आचारसंहिता लागेपर्यंत विश्वास ठेवायचा.'
हे ही वाचा>> Manoj Jarange : "माझ्या समाजाची लेकरं संपवू नका, नाहीतर...", मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा
'सरकारला सांगतो.. सरकार... ओए सरकार... आचारसंहिता लागायच्या आत या राज्यातील सगळ्या जनतेच्या प्रश्नांची अंमलबजावणी करायची. जर नाही केली तर तुम्हाला सगळ्यांना आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हा सगळ्यांना जे सांगेल ते सगळ्यांचं ऐकायचं.. एक विचाराने सांगा.. करणार का? कारण मला इथून तुम्हाला निर्णय देता येत नाही.'
'शेवटचं सांगतो.. वेळ पाहिजे म्हणतात.. 13 महिन्यांपासून काय केलं? आपली तयारी पक्की आहे.. 13-14 महिन्यांपासून... त्यांचं बघायचंय काय करतात ते.. त्यांनी सगळं केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केलं की, त्यांचं सगळं गणित विचकून टाकायचं..'
'एकाएकीच उलटा निर्णय घ्यायचा. तुम्ही म्हणाल जे अपेक्षित होतं ते बोलायला पाहिजे होतं. तुम्हाला फक्त शॉर्टकटच सांगतो.. तुमच्या मनात जे आहे, तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी.. तुमची शान वाढवणारच..'
'फक्त वेळप्रसंगी जे सांगेल ते तुम्ही ताकदीने करायचंय.. एकानेही मागे हटायचं नाही. पुन्हा एकदा सरकारला सांगतोय.. या करोडो समाजाच्या बांधवांच्या वतीने सांगतो.. आचारसंहिता लागायचा आत.. किंवा आचारसंहिता लावू नका.. जर तुम्ही आम्हाला खुन्नस देऊन आमचा अपमान करून, आमच्या डोळ्यात चटणी टाकून तुम्ही तर अवमान केला तर तुमच्याही नाकावर टिच्चून तुम्हाला उलथं केल्याशिवाय तुम्हाला मागे हटणार नाही.'
'तुमच्या लेकरांना सुखाचे दिवस आणायचा शब्द या नारायण गडावरून तुम्हाला देतोय. मराल.. वेळप्रसंगी मरण पत्कराल पण तुम्ही मान खाली होऊ देणार नाही.'
'जे सरकार तुम्हाला संपवायचं बघेल त्याला संपवल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंच मागे सरकणार नाही.' असं मनोज जरांगे यावेळी म्ङणाले.
ADVERTISEMENT