Sharad Pawar-Pratibha Pawar: 'ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही...', प्रतिभा पवारांचा रोखठोक बाणा, पवारांनी सांगितला किस्सा!

रोहित गोळे

14 Nov 2024 (अपडेटेड: 14 Nov 2024, 12:15 PM)

Sharad Pawar and Pratibha Pawar: आंबेगावमधील जाहीर सभेत पत्नी प्रतिभा पवार यांचा एक किस्सा सांगत शरद पवारांनी थेट दिलीप वळसे पाटलांवर टीका केली.

वळसे-पाटलांबाबत प्रतिभा पवार असं का म्हणाल्या? (फाइल फोटो)

वळसे-पाटलांबाबत प्रतिभा पवार असं का म्हणाल्या? (फाइल फोटो)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रतिभा पवारांचा तो किस्सा पवारांनी सांगितला

point

दिलीप वळसेंबद्दल प्रतिभा पवार नेमकं काय म्हणाल्या?

point

आंबेगावमधील जाहीर सभेत पवारांची तुफान फटकेबाजी

Sharad Pawar Wife Pratibha Pawar: आंबेगाव: 'ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही.. असं मला माझ्या बायकोने सांगितलं.' असं म्हणत शरद पवार यांनी आंबेगावमधील सभेत दिलीप वळसे-पाटलांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या पवारांनी वळसेंवर टीका करताना प्रतिभा पवार वळसे-पाटलांबाबत नेमकं काय म्हणाल्या हेच जाहीर सभेत सांगून टाकलं. (we will not go to the door of those who left you sharad pawar told the story of wife pratibha pawar)

हे वाचलं का?

अजित पवार यांच्यासोबत जे 40 आमदार निघून गेले त्यामध्ये दिलीप वळसे-पाटील यांचाही समावेश होता. जो शरद पवारांसाठी धक्का समजला जात होता. कारण दिलीप वळसे पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. पण त्यांनीच पवारांची साथ सोडल्याने शरद पवार यांच्या पत्नी म्हणजेच प्रतिभा पवार या सुद्धा दुखावल्या गेल्या.

हे ही वाचा>> Sharad पवार थेट म्हणाले, 'गद्दाराला शिक्षा.. वळसे-पाटलांना 100 टक्के पराभूत करा'

त्यामुळेच काही दिवसांपूर्वी भीमाशंकराच्या दर्शनाला आलेल्या असताना देखील प्रतिभा पवार या दिलीप वळसे पाटलांकडे गेल्या नाहीत. असं शरद पवार यांनी जाहीर सभेत सांगितलं

प्रतिभा पवार नेमकं काय म्हणालेल्या? 

'माझी बायको वर्षातून एकदा भीमाशंकराच्या दर्शनाला येते. पूर्वीच्या काळात दत्तू पाटील होते त्या वेळेस ते देखील तिथे नेहमी जायचे. आता हा उद्योग त्यांनी (दिलीप वळसे) ज्या दिवशी केला. आम्हा लोकांची साथ सोडली चुकीच्या लोकांबरोबर गेले. त्यानंतर माझी बायको परवा भीमाशंकरच्या दर्शनाला गेली.'

हे ही वाचा>> Sharad Pawar: 'पक्ष फोडायला अक्कल लागत नाही', पवारांनी फडणवीसांची थेट...

'मला माहीत नव्हतं. आल्यावर मी चौकशी केली की, तुम्ही जाऊन आलात..? म्हणाले हो.. तुमची व्यवस्था नेहमीसारखी? नाही, म्हणाल्या नेहमीसारखी नाही.. मी म्हटलं मला काही कळलं नाही. म्हणाल्या, ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही आम्ही डायरेक्ट भीमाशंकराच्या दारात गेलो. हे त्यांनी सांगितलं.' असा किस्सा सांगत शरद पवार यांनी दिलीप वळसे-पाटलांवर निशाणा साधला. 

'त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते'

यानंतर पवार असंही म्हणाले की, 'त्यांनी काय बोलायचं शिल्लक ठेवलंय यांनी. काहीच ठेवलं नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते.' 

'350 वर्षांपूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांशी गणोजी शिर्केंनी गद्दारी केली. ती महाराष्ट्र विसरलेला नाही.. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना सुट्टी नाही. आता एकच विचार आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा एकच शब्द तुम्हाला आहे की, या निवडणुकीत वळसे-पाटलांना 100 टक्के पराभूत करा.. करा.. करा... हेच सांगतो.' असंही पवार यावेळी म्हणाले.

    follow whatsapp