Vidhansabha Election 2024: 'मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक...', राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य!

मुंबई तक

13 Nov 2024 (अपडेटेड: 13 Nov 2024, 06:28 PM)

राज-उद्धव वाद निवडणुकीच्या तोंडावर विकोपाला जाण्याची शक्यता गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे वाटत होतं. मात्र एका मुलाखतीत राज ठाकरेंनी एक सकारात्म पाऊल टाकण्याची तयारी दाखवल्याचं दिसतंय. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

point

उद्धव ठाकरेंशी चर्चा होणार का?

point

दोन्ही भावांमध्ये दुरावा का?

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातले वाद समोर येताना दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावरही वारंवार दोन्ही भाऊ एकमेकांवर टीका करत आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. अमित ठाकरे हे सध्या निवडणुकीच्या मैदानात असून उद्धव ठाकरेंनी मात्र आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. राज ठाकरे वारंवार हा मुद्दा बोलून दाखवतात. तर 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता हा वाद आणखी विकोपाला जाणार का अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत राज ठाकरेंनीही या वादाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले

 

राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी प्रस्ताव देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो उद्धव ठाकरेंनीच फेटाळला अशी चर्चा नेहमी होते. मात्र आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा एका मुलाखतीत सकारात्मक भूमिका मांडल्याचं दिसतंय. राज ठाकरे यांनी या वादावर लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक तसंच मराठी माणूस व्यक्त करत असतो. याबद्दल राज ठाकरे विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्यामध्ये आतलेही आहेत आणि बाहेरचेही. मात्र मी अलर्ट असतो. एकत्र येण्याचा विषय एकट्याच्या इच्छेचा नाही. एकत्र यायचं असेल तर त्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे. चर्चा होत नसेल तर बोलण्याला काय अर्थ आहे असं राज ठाकरे म्हणाले. 

 

हे ही वाचा >>Uddhav Thackeray Exclusive : मुख्यमंत्रिपदाचा विषय काढताच ठाकरेंनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडंचं नाव का घेतलं?

 

राज ठाकरे या विषयावर पुढे बोलताना म्हणाले की,  जगभरात तुम्ही बघितलं तर वर्षानुवर्षांचे वाद मिटवून दुश्मन एकत्र येऊ शकतात. मात्र पुढे त्यांनी एका टोलाही उद्धव ठाकरे यांना मारला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते. भाऊ वाटत नाही, त्यामुळे यावर माझ्याकडे बोलण्यासारखे काय असू शकेल? असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


एकूणच या विषयावर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुंबई तकला दिलेल्या एका मुलाखतीत अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यावर भाष्य केलं होतं. उद्धव ठाकरे म्हणाले, "मी वडील आहे आणि मुलगा सुद्धा आहे. माझ्या वडिलांना झालेल्या यातना मी विसरू शकत नाही, त्यावेळी शिवसेना भवनावर जी दगडफेक झाली, ज्या शिवसैनिकांचं रक्त सांडलं, त्या शिवसैनिकांशी माझं रक्ताचं नातं आहे. ती दगडफेक कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. माझ्या शिवसैनिकांची डोकी फुटली होती. रक्ताचा सडा पडला होता, तेच शिवसैनिक माझ्या संकट काळात धावून येत आहेत. आज हे माझ्यावर टीका करतायत. माझ्याबद्दल, आदित्यबद्दल वाटेल ते बोलतायत. मी किंवा आदित्यने एकदाही वेडीवाकडी टीका केली नाही. तुम्ही माझी खिल्ली उडवत असाल. माझ्या आजरपणावर टीका केली, माझी चेष्टा केली, मग रक्ताचं नातं कोणतं? रक्ताचं नातं हे सगळीकडे जपलं पाहिजे, फक्त निवडणुकीच्या काळात उमेदवार न देणं एवढंच रक्ताचं नातं नसतं. इतर वेळी तुम्ही माझी खिल्ली उडवत असाल तर त्या रक्ताच्या नात्याला किंमत नाही" असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. अर्थातच राज ठाकरेंनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर घडलेल्या गोष्टींकडे उद्धव ठाकरे यांनी इशारा केला.
 

    follow whatsapp